Saturday, 26 September 2026

पत्रकारिता हा लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ आहे असे सांगून क्षेत्रीय भेटी दिल्याने पत्रकारांना एखाद्या विषयाचे समग्र

 पत्रकारिता हा लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ आहे असे सांगून क्षेत्रीय भेटी दिल्याने पत्रकारांना एखाद्या विषयाचे समग्र आकलन होण्यास मदत होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पत्रकार हे शासन व समाजात सेतूचे कार्य करीत असतात. 'स्तंभ' हा नेहमी सरळ व मजबूत असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

 

वृत्तांकन करीत असतानाच  पत्रकारांनी नशामुक्त भारत अभियान, टीबीमुक्त भारत मोहीम आदी कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीचे काम करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.   

 

शासन योजना तयार करते व त्यांची अंमलबजावणी करते. या योजनांबाबत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी करावे असे राज्यपालांनी सांगितले. 

अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, एसईबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र प

 अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, एसईबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

या विशेष मोहिमेमुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक माध्यमे तसेच अन्य माध्यमांतून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.

सेवा संकल्प अभियान’तून विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती · प्रलंबित प्रकरणांच्या त्रुटीपूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 सेवा संकल्प अभियान’तून विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती

·         प्रलंबित प्रकरणांच्या त्रुटीपूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 

मुंबई, दि. २५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

 

Friday, 25 September 2026

माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना

 शेवटी, माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि 'सारथी'च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. "आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत," अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना आश्वस्त केले.

राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, सुमारे 3 हजार माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

     

शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ

 पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. शेतकरी माल पिकवतो, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन साखळीत माथाडींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वाशी मार्केटच्या इमारती आता जीर्ण झाल्या असून, बदलत्या जागतिक व्यापाराची गरज ओळखून या संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण कितीही आले तरी माथाडी कामगारांचे काम आणि महत्त्व अबाधित राहील, असे स्पष्ट करत 50 किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Journalists from Naxal belt of Chhattisgarh, Bihar meet Maharashtra Governor

 Journalists from Naxal belt of Chhattisgarh, Bihar meet Maharashtra Governor

 

A group of media persons from the Naxalism affected Chhattisgarh and Bihar today called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai on Fri (25 Sept).

 

The visit was organised by the Press Information Bureau and led by Director General of PIB (Western Region) Smita Vats Sharma.

 

Stating that journalism is a strong pillar of democracy, the Governor called upon the media persons to create awareness about national programmes such as Nasha Mukt Bharat Abhiyan, TB Mukt Bharat and others.

0000

 

Featured post

Lakshvedhi