Thursday, 24 September 2026

लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचा वापर करा · महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

 लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचा वापर करा

·         महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

 

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

 

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष कार्यक्रमात मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.

नशामुक्त मुंबई’साठी जनजागृती

 नशामुक्त मुंबई’साठी जनजागृती

विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी अभियानाविषयी माहिती दिली. तसेच  मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानातील सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद आवळे, उपनिरीक्षक सागर घाडगे, उपनिरीक्षक अस्लम मुजावर आणि त्यांच्या पथकाने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता टोल फ्री क्रमांक १९३३ वर आणि जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.

       विभागीय संपर्क अधिकारी गजानन पाटील यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. सद्यस्थितीत एल निनोमुळे राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.


जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे

प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा विकास, खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या मुलाखतीतून देओल यांनी दिली आहे.

 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. याचबरोबर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंगळवार 29 सप्टेंबर, बुधवार 30 सप्टेंबर तसेच गुरूवार 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

 

अधिकृत समाजमाध्यमे :

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंचा शोध, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, महिला व दिव्यांग खेळाडूंसाठीच्या योजना, तसेच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांसाठीची तयारी याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ‘मिशन लक्ष्यवेध’, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे आणि खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती या मुलाखतीतून देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राची वाटचाल, खेळाडूंसाठी शासनाच्या विविध योजना, ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणाऱ्या संधी, महिला व दिव्यांग खेळाडूंसाठीच्या सुविधा, तसेच भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या तयारीबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रधान सचिव देओल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं.


माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ · गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती

 माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’

·         गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती

            मुंबई, दि. २४ : केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारत संकल्प केला आहे. त्यानुसार  महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून करण्यात येत आहे.

       मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोकसंवाद उपक्रमाचा भाग म्हणून  माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर भक्तगण, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना शासनाच्या योजना, उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली.

       या उपक्रमात ‘नशामुक्त  मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र', इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी  करण्यात आले.


महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात विशेष महिला रोजगार मेळाव्याचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन

 महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात

विशेष महिला रोजगार मेळाव्याचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन

 

मुंबई, दि.२४: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने “पंडीत दिनदयाळ रोजगार महाकुंभ ”या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठात भव्य महिला विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना थेट उद्योग व आस्थापनांशी जोडणे तसेच कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे व ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार, प्रो. हेमलता बागला (अति. कार्य.) आणि कुलगुरू श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ  यांचेकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व परिसरातील सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना या माध्यमातून त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे. १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र महिला उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्व-नोंदणी पूर्ण करावी.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याचा अधिकृत तपशील खालीलप्रमाणे आहे.

दिनांक: २९ सप्टेंबर २०२६

वेळ: सकाळी ९ वाजेपासून

स्थळ: एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसर, चर्चगेट

पात्रता: १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमाधारक व सर्व पात्र महिला उमेदवार.

मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्यवस्था

Ø  ३० स्टॉल्सची उभारणी : मेळाव्यात महिला उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

Ø  २०+नामांकित आस्थापनांचा सहभाग : विविध क्षेत्रांतील २० हून अधिक कंपन्या व आस्थापना थेट मुलाखतींद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

Ø  ५ शासकीय महामंडळांचा सहभाग : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ प्रमुख शासकीय महामंडळे या मेळाव्यात सहभागी होत आहेत. ही महामंडळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा आणि इतर उपक्रमांची थेट माहिती देतील.

Ø  कौशल्य विकास प्रशिक्षण : विविध कौशल्य प्रशिक्षण योजना व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देणारे विशेष स्टॉल्स येथे उपलब्ध असतील.

Ø  जपानमधील रोजगाराच्या संधी : मेळाव्यात उमेदवारांना थेट जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता एक स्टॉल चे नियोजन करण्यात आले आहे. ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुंबई शहर मधील सर्व उद्योजकांनी आणि बेरोजगार  महिलांनी  या “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ” मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना

 दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.अत्यल्प पाऊसमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याच प्रमाणे चारा उपलब्धतेसाठीही दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेटपणे मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरु होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सईताई डहाके आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी,  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरीबांधव उपस्थित होते

मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतातील नुकसानाची पाहणी

 मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Featured post

Lakshvedhi