Saturday, 19 September 2026

नशामुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती

 नशामुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती

महाराष्ट्रासह मुंबईला नशामुक्त आणि अमली पदार्थमुक्त करण्यासाठी गृह विभाग व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानाचे सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद जाधव, वरिष्ठ सहायक संचालक दत्तात्रय कोकरे आणि विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. नशेचे दुष्परिणाम आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीचा संदेश देत नशामुक्त महाराष्ट्रच्या घोषणाही देण्यात आल्या.

गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

चिंचपोकळीतील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजन डिचवलकर, उपाध्यक्ष प्रणील पांचाळ, रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मंगेश पिपरकर, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस राकेश जेजुरकर आणि खजिनदार शंकर साळवी, लालबाग मधील बाल युवक उत्सव मंडळ तेजुकायाचे अध्यक्ष उपेंद्र सावंत, कार्याध्यक्ष प्रभाकर हडकर, चिटणीस गीतेश गवस आणि खजिनदार मनोहर बटवाल, लालबागमधील राजा तेजुकायाचे अध्यक्ष राजेंद्र सातार्डेकर, उपाध्यक्ष अमित वालगुडे, खजिनदार अमोल भाबड आणि उपखजिनदार अमोल सावंत यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त या उपक्रमात सहभागी झाले.

जम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर जम्मू येथे महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाची सुरेल मैफिल

 जम्मू येथे लोककलेतील श्रीगणेशमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर

जम्मू येथे महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाची सुरेल मैफिल

 

मुंबई, दि. 19 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राची समृद्ध लोककला, शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित लोककलेतील श्रीगणेशया विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला जम्मू येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पद्मश्री पद्मा सचदेव गव्हर्नमेंट कॉलेज ऑडिटोरियम, गांधीनगर, जम्मू येथे शुक्रवारी (दि.18)  झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. गणेशभक्ती, महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि विविध कलाविष्कार यांचा सुरेल संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...या भक्तिमय जयघोषाने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील लोककला आणि शास्त्रीय कलापरंपरेचे सादरीकरण जम्मूतील रसिकांसमोर झाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाला या कार्यक्रमातून बळ मिळाले.

अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा

 अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा

                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोहरा नदी पुनरुज्जीवनासह विविध कामांचा आढावा

 

नागपूर, दि. 19 : नागपूर शहरात 'अमृत 2' अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च 2027 पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शहरात 'अमृत 2' योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या महत्त्वाच्या विषयांवर रामगिरी शासकीय निवास येथे आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस ते बोलत होते. आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्री यांच्या ओएसडी श्रीमती आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान 'अमृत 2' योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम व त्यानंतरच्या पुनर्भरण (restoration) कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम व पुनर्भरणच्या कामाबद्दल समस्या मांडल्या. तसेच नगरसेवकांनी रिंग रोड वरील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामाबद्दलही काही मुद्दे मांडण्यात आले. आमदार श्री. दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती दिली. 

यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) सक्तीने अवलंब करावा. भविष्यात शहरात होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून एक सर्वसमावेशक  'धोरण' तयार करावे, याशिवाय संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सक्त कारवाई करण्याची  ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बैठकीत मनपा आयुक्त डॉ. इटनकर यांनी संगणकीय सादरीकरण करीत 'अमृत 2' योजनेच्या कामांसोबतच आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन प्रकल्पावरही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी) बद्दलची माहिती दिली. जयताळा येथे 10 एमएलडी, चिखली येथे 35 एमएलडी एसटीपी उभारण्यात येणार असून, चिंचभवन, बीडीपेठ, सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

लोकसंवाद’ अभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर चिंचपोकळी, लालबाग, भायखळ्यातील गणेश मंडळांतील नागरिकांशी थेट संवाद ओबीसींच्या योजनांची माहिती

 लोकसंवादअभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर

चिंचपोकळी, लालबाग, भायखळ्यातील गणेश मंडळांतील नागरिकांशी थेट संवाद

 

मुंबई, दि. 19 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शासकीय योजनांची माहिती थेट गणेशभक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकसंवादअभियानाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.

शुक्रवारी आयोजित या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, तसेच नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गणेशभक्तांना देण्यात आली.

ओबीसींच्या योजनांची माहिती

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी दिली. नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

 राज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

 मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

 

मुंबई, दि. 19 राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या निवासस्थानी विराजमान पाच दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी (दि. 18) लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

 

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यपाल श्री. वर्मा मुंबईबाहेर असल्यामुळे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गणरायाची आरती केली व बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता निवासस्थानाबाहेर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली श्रींची मूर्ती पर्यावरण स्नेही शाडू माती होती.  विसर्जित मूर्तीच्या मातीमध्ये कडुलिंबाचे रोप लावण्यात येणार आहे. राज्यपालांचे सहसचिव एस रामामूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

0 0

मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल

 मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

            मुंबई, दि. १८ - मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


 


            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.


 


            मुख्यमंत्री म्हणाले की, यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


 

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला

 गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी अॅड. शेलार यांचे अभिनंदन केले.

Featured post

Lakshvedhi