Saturday, 19 September 2026

बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड · परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

 बाप्पा डॉट ऑर्गवर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड

·         परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

 

            मुंबई, दि. १८ : सांस्कृतिक कार्य विभागाच्या घरोघरी बाप्पाउपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या Bappa.org वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची मूर्ती, नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा उत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश आहे.

 

            राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्रदेण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’मध्ये एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलासमध्ये एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार, आधुनिक व पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांवर शासनाचा विशेष भर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू व पुणे रिंग रोड यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. या प्रकल्पांची प्रगती व भविष्यातील पायाभूत विकासाचे नियोजन याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमातून माहिती दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमातून श्री. गायकवाड यांची विशेष मुलाखत मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. तसेच दिलखुलासकार्यक्रमातून दि. 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे. 

 अधिकृत समाजमाध्यमे :

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत श्री. गायकवाड यांनी विविध पायाभूत प्रकल्पांची सद्यःस्थिती, रस्ते सुरक्षा, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि विकसित महाराष्ट्र 2047’च्या अनुषंगाने एमएसआरडीसीच्या आगामी नियोजनाबाबत माहिती दिली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, तर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पुणे रिंग रोड यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची भूमिका, नव्या शहरांच्या विकास आराखड्यांमध्ये पायाभूत सुविधा व भविष्यातील गरजांचा विचार तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागांमध्ये संतुलित विकास साधण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहितीही त्यांनी दिली.

पायाभूत सुविधांच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनावर भर देत समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेसह हरित ऊर्जेच्या वापराचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम व वेगमर्यादेचे पालन करून रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत

 नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

            राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत  सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर गणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून परंपरा, देखावा किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. माहिती यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर शासनाचे अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

            वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पर्यावरणपूरक कलाकृती आणि समाजोपयोगी उपक्रम असलेल्या नोंदींची दैनंदिन पाच कथांसाठी निवड करून त्यांना शासनाच्या विविध माध्यमांवर प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू

 पुढील वर्षी पुणे महोत्सवराज्यातील नंबर एकचा महोत्सव करू

- सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार

·         गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

·          

            पुणे, दि. 18 : पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव पुणे महोत्सवम्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

 

            सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, कलाकार अथर्व सुधामे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

            गणेशोत्सवातील सहभागिता, सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी, देखावे आणि परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. जगात अशा व्यापक स्वरूपाचा उत्सव अन्यत्र आढळणे कठीण आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, असे अॅड. शेलार यांनी सांगितले.

एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल Pl share

 एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी  

एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

 

            मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले असून, संबंधित लाभार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार ओटीपीचा पर्याय

            ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळणार

            २१ सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून रु. १९९ शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरण

            १९ सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

क्यूआर कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट

            १६ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना क्युआर कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत एनसीएमसी कार्ड ॲक्टीव्ह करून त्यामध्ये टॉप-अप करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सर्व सवलतधारकांनी तातडीने एनसीएमसी नोंदणी करावी*

            एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तात्काळ एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे.

विकसित भारत’ ही संकल्पना सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि सांस्कृतिक वारशाच्या मुळांशी जोडलेली

 विकसित भारतही संकल्पना सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि सांस्कृतिक वारशाच्या मुळांशी जोडलेली असावी. प्रत्येक प्रदेश, समाजघटक आणि नागरिकाला विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी. पुणे फेस्टिव्हलसारखे महोत्सव सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडतानाच स्थानिक कलाकार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला संधी उपलब्ध करून देतात, असे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केले.

 

            पुण्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक क्षेत्रातील तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणालेपुणे हे देशातील महत्त्वाचे शिक्षणकेंद्र असून शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि ग्रंथालयांमधून ज्ञान-विचारांची देवाणघेवाण होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगसारख्या संस्थांसह उद्योग, माहिती तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, पर्यटन आणि वास्तुकला क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याने देशाच्या प्रगतीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध क्षेत्रांतील प्रगतीसोबतच उत्सव आणि सांस्कृतिक वैविध्याची नगरी म्हणूनही पुण्याची ओळख निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

महिलांना कला, सर्जनशीलता आणि प्रतिभा सादर करण्यासाठी

 महिलांना कला, सर्जनशीलता आणि प्रतिभा सादर करण्यासाठी पुणे फेस्टिव्हलने व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला चालना मिळते. पुणे फेस्टिव्हलशी संबंधित महिला पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करत त्यांनी वैयक्तिक दुःखावर मात करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचे कौतुक केले.

Featured post

Lakshvedhi