नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर गणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून परंपरा, देखावा किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. माहिती यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर शासनाचे अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र देण्यात येईल.
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पर्यावरणपूरक कलाकृती आणि समाजोपयोगी उपक्रम असलेल्या नोंदींची दैनंदिन पाच कथांसाठी निवड करून त्यांना शासनाच्या विविध माध्यमांवर प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment