‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड
· परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम
मुंबई, दि. १८ : सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या Bappa.org वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची मूर्ती, नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा उत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश आहे.
राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment