Thursday, 10 September 2026

मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन

 मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो.

             गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली.

            पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, शाडू मातीपासून बाप्पा घडवणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला वसुंधरा रक्षकम्हणून सिद्ध केले आहे. संस्कृती जपत पर्यावरण रक्षणाचा हा संदेश घराघरात पोहोचविणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.

            ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडू माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाला आपल्यासोबत मूर्ती घडवताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. आपण स्वतः करू शकतो तर प्रत्येक कुटुंबही पर्यावरणपूरक बाप्पा साकारू शकते, असा ठाम आणि प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश या उपक्रमाने संपूर्ण समाजाला दिला.

             शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कला क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने हा जागतिक विक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच

 गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
  • पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः मूर्ती घडवून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

ठाणे, दि.१० : गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला.

             या ऐतिहासिक सोहळ्याला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ महिला वैज्ञानिक

 प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांचा गौरव

हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ महिला वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांचाही राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेत महिला वैज्ञानिकांच्या योगदानाची विशेष दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मभूषण डॉ. टी. रामासामी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने वैज्ञानिक, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

००००

 

विज्ञान क्षेत्रातील महिलांना नेतृत्वाच्या अधिक संधी द्याव्यात

 विज्ञान क्षेत्रातील महिलांना नेतृत्वाच्या अधिक संधी द्याव्यात

            विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरजही राज्यपालांनी अधोरेखित केली. परिषदेत 12 कर्तृत्ववान महिला वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिला वैज्ञानिकांना संशोधनातील नेतृत्व, विद्यापीठ प्रशासन, उद्योजकता तसेच उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थांनी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. रसायन अभियांत्रिकी क्षेत्राची प्रदूषणकारी उद्योग म्हणून बदनामी झाली असली, तरी प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा देखील याच क्षेत्रातून निघणार आहे, असे संस्थेचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.

 

रसायन तंत्रज्ञान संस्थेने देशाला 18 पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक आणि सुमारे 7000 प्रथम पिढीतील उद्योजक दिले असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू आणि इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांनी सध्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संशोधक आणि पीएचडी धारक निर्माण करणे आवश्यक असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. एम. एम. शर्मा यांनी सांगितले.

विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा

 विज्ञान आणि समाज सप्ताहआयोजित करावा

रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी विज्ञान आणि समाज सप्ताहआयोजित करावा, अशी विशेष सूचना राज्यपालांनी केली. या सप्ताहादरम्यान संस्थेने नागरिक, महाविद्यालये आणि शाळांसाठी आपली दालने खुली करावीत आणि संस्थेत सुरू असलेले संशोधन व नवोन्मेष सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगावेत, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विज्ञानावरील जनतेचा विश्वास वाढेल, तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि प्रयोगशाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असे राज्यपालांनी सांगितले. विज्ञानाचा अंतिम उद्देश जनसेवा हाच आहे. आपल्या वैज्ञानिकांचे संशोधन कोणत्या क्षेत्रात सुरू आहे, ते कोणत्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या संशोधनाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, याची माहिती नागरिकांना असली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. वर्षातून एक आठवडा तरी विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर येऊन थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

विज्ञान प्रयोगशाळेतून समाजापर्यंत पोहोचवावे

 विज्ञान प्रयोगशाळेतून समाजापर्यंत पोहोचवावे

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

  • रसायन तंत्रज्ञान संस्थेने विज्ञान आणि समाज सप्ताहआयोजित करावा

 

मुंबई, दि. 10 : वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा आणि शोधनिबंधांपुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), माटुंगा, मुंबई येथे आयोजित हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करीत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

            वैज्ञानिकांनी व्यवहार्य, परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील अशी हरित तंत्रज्ञाने विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

            भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या उत्पादन आणि रसायन उद्योगांच्या पार्श्वभूमीवर, रसायन तंत्रज्ञान संस्था आणि इंडियन केमिकल सोसायटी यांसारख्या संस्थांनी भारताला हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरण आणि शाश्वत रासायनिक अभियांत्रिकीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

            भारताने केवळ इतर देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, जगाने स्वीकारावे असे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, असेही राज्यपालांनी नमूद केले.

जाळीचा देव-सावळदबारा रस्त्याच्या विकासासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

 जाळीचा देव-सावळदबारा रस्त्याच्या विकासासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

-वनमंत्री गणेश नाईक

·         कालिंका देवी मंदिर परिसरातील कामे निसर्ग पर्यटन योजनेतून करावीत

 

मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा हे राखीव वनक्षेत्र आहे. जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्त्याचा विकास करण्यासह मौजे टिटवी येथील कालिंका देवी मंदिर व परिसराची विकासकामे निसर्ग पर्यटन योजनेतून करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्ता वन विभागाच्या जागेतून विकसित करणे तसेच कालिंका देवी मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री श्री. नाईक बोलत होते. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, ऐतिहासिक वास्तूंचे जतन तसेच ऐतिहासिक मंदिरांच्या परिसराचा विकास करण्यात यावा. आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही उपलब्ध करून द्यावी.

जाळीचा देव ते सावळदबारा हा रस्ता अजिंठा-बुलढाणा राज्य महामार्गाला जोडलेला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी वन विभागाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही वनमंत्री श्री. नाईक यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi