Thursday, 10 September 2026

विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा

 विज्ञान आणि समाज सप्ताहआयोजित करावा

रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी विज्ञान आणि समाज सप्ताहआयोजित करावा, अशी विशेष सूचना राज्यपालांनी केली. या सप्ताहादरम्यान संस्थेने नागरिक, महाविद्यालये आणि शाळांसाठी आपली दालने खुली करावीत आणि संस्थेत सुरू असलेले संशोधन व नवोन्मेष सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगावेत, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विज्ञानावरील जनतेचा विश्वास वाढेल, तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि प्रयोगशाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असे राज्यपालांनी सांगितले. विज्ञानाचा अंतिम उद्देश जनसेवा हाच आहे. आपल्या वैज्ञानिकांचे संशोधन कोणत्या क्षेत्रात सुरू आहे, ते कोणत्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या संशोधनाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, याची माहिती नागरिकांना असली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. वर्षातून एक आठवडा तरी विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर येऊन थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi