Friday, 4 September 2026

परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल

 परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम

हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल

-         बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर

            मुंबई, दि. ४ - भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते 'ॲडमासअर्थात कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले.

            महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली, हिरे उद्योगाशी संबंधित उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या सबलीकरणासाठी प्रादेशिक तफावत दूर करावी

 महिलांच्या सबलीकरणासाठी प्रादेशिक तफावत दूर करावी

-केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान

·         बँक अधिकाऱ्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर संवेदनशीलतेने काम करावे

 

 

      मुंबई,दि. ३ : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना केवळ शासकीय योजनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने आणि सर्वोत्कृष्ट योगदान देऊन काम करावे, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.

 

मुंबईतील हॉटेल हयात येथे आयोजित 'स्वयं सहाय्यता गट-बँक संलग्नता' या राष्ट्रीय आढावा बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव रोहित कंसल आणि .

मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ६ कोटी लखपती दीदी घडवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रशासनाने महिलांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करून 'मिशन मोड'वर काम करावे. देशातील ३ कोटी 'लखपती दीदीं'चा टप्पा गाठणे तुलनेने सोपे होते; मात्र आता ६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षाला ३० ते ५० हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या तळागाळातील महिलांना लखपती बनवावे लागेल .

      अनेकदा आधीच संपन्न असणाऱ्या भागांत बँका सहजासहजी कर्जवाटप करतात. मात्र 'जिथे खरी गरिबी आहे, तिथे बँकांनी अधिक लक्ष पुरवणे आवश्यक आहे. ग्रामीण महिलांना सर्वात जास्त अडचणी बँक पातळीवरच येतात, हे नमूद करत त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि संवेदीकरण करण्यावर भर दिला. तसेच, जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकांना अनेक खासगी बँकांचे प्रतिनिधी दांडी मारतात, अशी तक्रार आल्याचे सांगत त्यांनी खासगी बँकांच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली

शिक्षकांचा प्रातिनिधीक सन्मान

 शिक्षकांचा प्रातिनिधीक सन्मान

            बौद्धिक अक्षम मुलांसाठी भारतातील पहिला प्रमाणित व एकसमान अभ्यासक्रम असलेल्या 'दिशा अभियानाची' प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम, जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर या पाच विशेष शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

            दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी प्रास्ताविकाद्वारे विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची तर अर्चना चंद्र यांनी जय वकील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिशा अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती

 पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांसाठी प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या १९६, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १५१ पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-पेसा क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २३ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १०१ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस प्रारंभ

 शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांच्या

कागदपत्र पडताळणीस प्रारंभ

·         आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

·         शिक्षण आयुक्तालयाकडून १,६०० उमेदवारांची यादी प्राप्त

 

मुंबई, दि.३ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेस गती देण्यात आली असून, पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, निर्धारित वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया  ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

 

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागास प्राप्त झाली आहे.

 

यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील ९२७, माध्यमिक शिक्षक संवर्गातील ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील २५२ उमेदवारांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह अन्य आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर करण्यात येत आहे.

 

विभागनिहाय पात्र उमेदवारांच्या संख्येमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ५८८ उमेदवारांचा समावेश असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६ उमेदवार तसेच अमरावती विभागात २९२ उमेदवार आहेत.

 

पडताळणी प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (स्वयंप्रमाणित) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांना निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित राहावे. निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांसाठी प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या १९६, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १५१ पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-पेसा क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २३ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १०१ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

 

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेनुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना व वेळापत्रकासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी

 राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने

मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी

·         सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव

·         नामवंत कलाकारांचे सादरीकरण

            मुंबई, दि. ३  : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवम्हणून मान्यता मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव  १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा उत्सव असून, त्याला संगीत, कला, भक्ती आणि लोकपरंपरेची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित या शास्त्रीय संगीत महोत्सवातून आठ दिवस विविध नामवंत कलाकारांच्या गायन व वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना मिळणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जतन, संवर्धन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

महोत्सवाची सुरुवात गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सुभद्रा देसाई यांच्या गायनाने होणार असून, त्याच दिवशी एस. आकाश आणि मेहताब अली नियाझी यांचे बासरी आणि सतार युगल वादन सादर होणार आहे. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी स्वर शर्मा आणि अनुजा झोकरकर यांचे गायन, शनिवार, १९ सप्टेंबर रोजी नूपुर गाडगीळ आणि नागेश आडगावकर यांचे गायन, तर रविवार,


२०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरची

 २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरची

मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. एमएमआर, पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचे शहरीकरण वेगाने होणार आहे. एमएमआरमध्ये भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता विकसित होत असून, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि डीप टेकचे परिसंस्थाही येथे विकसित करण्यात येणार आहेत. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Featured post

Lakshvedhi