Wednesday, 2 September 2026

शाश्वत विकासासाठी कटिबद्ध

 शाश्वत विकासासाठी कटिबद्ध

पणनमंत्री श्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र आहे. जैवतंत्रज्ञान, नवकल्पना तसेच कृषी, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील जैवआधारित उपायांच्या माध्यमातून राज्याचा विकास अधिक शाश्वत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.ऑस्ट्रेलियाकडे जागतिक दर्जाचे विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल आणि संशोधन क्षमता असून महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता आहे. या सामर्थ्यांच्या आधारे दोन्ही अर्थव्यवस्थांना लाभदायक ठरणाऱ्या मूल्यसाखळ्या विकसित करता येतील.

जैवउत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती देणार -

 जैवउत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती देणार

-पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २ : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संधींचे प्रत्यक्ष प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्सस्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे पणनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून महाराष्ट्रातील जैवउत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन सहकार्याच्या संधींबाबत संवाद साधला.

बैठकीस केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे उपमहावाणिज्यदूत ख्रिश्चन जॅक, इडन ब्रू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब ब्राऊन, न्युवेरा बायो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लुसी सेमेनेक, हायजीन रिन्यूएबल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस ब्राऊन, ऑस्ट्रेलियाच्या जनुक तंत्रज्ञान नियामक कार्यालयाच्या मिशेल वूस्टर आणि ऑस्ट्रेलियाच्या अन्न मानके कार्यालयाच्या गायत्री सुब्रमण्यम उपस्थित होत्या.

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार

 डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

·         प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य

मुंबई, दि. २ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आवश्यकतेनुसार मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ताज प्रेसिडंट येथे आयोजित सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डिजिटल हेल्थ केअर परिषदेत भविष्यातील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांबाबत आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, मित्रा संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सुधीर मेनन, डॉ. नारायणी यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. या निधीचा परिणामकारक वापर करून नागरिकांना योग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी डिजिटल प्रणाली, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना प्रभावी नियोजन, अचूक माहिती आणि नियमित संनियंत्रण महत्त्वाचे आहे. अन्य राज्यांनी विकसित केलेल्या केंद्रीकृत आरोग्य संनियंत्रण पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त आणि परिणामकारक मॉडेल विकसित करता येईल. तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा वितरणातील त्रुटी ओळखणे, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि आवश्यक सुधारणा करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाची लोकसेवेप्रती असलेली बांधिलकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे कौशल्य यांचा संगम झाल्यास विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळेल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच निधीचा पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

चर्चासत्रात सहभागी कंपन्या, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी व्यवहार्य, सकारात्मक आणि ठोस सूचना मांडाव्यात. या सूचनांच्या आधारे सार्वजनिक आरोग्य विभागासाठी प्रभावी डिजिटल संकल्पना विकसित करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा अंतिम लाभ राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आरोग्यपूर्ण हास्य फुलले पाहिजे, हीच शासनाची भूमिका आहे. दिवसभरातील परिसंवादातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा ठोस कृती आराखडा पुढे येईल, असा विश्वासही मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.

यावेळी स्पेशल इश्यू ई हेल्थ मॅगिझीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तर कॅन्सरवरील तपासणी आणि लगेच उपचार तंत्रज्ञानाचा शुभारंभही मंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध तंत्रज्ञानांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

0000

डिजिटल प्रणाली, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे

 सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. या निधीचा परिणामकारक वापर करून नागरिकांना योग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी डिजिटल प्रणाली, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना प्रभावी नियोजन, अचूक माहिती आणि नियमित संनियंत्रण महत्त्वाचे आहे. अन्य राज्यांनी विकसित केलेल्या केंद्रीकृत आरोग्य संनियंत्रण पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त आणि परिणामकारक मॉडेल विकसित करता येईल. तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा वितरणातील त्रुटी ओळखणे, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि आवश्यक सुधारणा करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार

 डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

·         प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य

मुंबई, दि. २ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आवश्यकतेनुसार मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ताज प्रेसिडंट येथे आयोजित सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डिजिटल हेल्थ केअर परिषदेत भविष्यातील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांबाबत आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, मित्रा संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सुधीर मेनन, डॉ. नारायणी यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित 

सीएसआर निधीतून राबविण्यात येणारे उपक्रम स्थानिक गरजांवर आधारित

 सीएसआर निधीतून राबविण्यात येणारे उपक्रम स्थानिक गरजांवर आधारित असावेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध संस्था, त्यांची सद्यस्थिती आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून प्राधान्यक्रम निश्चित करावा. उद्योगांनी शासनाच्या विकास आराखड्याशी समन्वय साधून काम केल्यास खऱ्या अर्थाने गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविता येतील, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय औद्योगिक परिसंघाने शासन आणि उद्योग क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होऊन सामाजिक गरजांनुसार ठोस उपक्रम राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करून सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी विविध उद्योगाच्या प्रतिनिधींना राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले.

आदिवासी आणि दुर्गम भागात डॉक्टरांसाठी आवश्यक निवास व्यवस्था, आरोग्य संस्थांचे पायाभूत बळकटीकरण

 आदिवासी आणि दुर्गम भागात डॉक्टरांसाठी आवश्यक निवास व्यवस्था, आरोग्य संस्थांचे पायाभूत बळकटीकरण, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेसाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या दर्जेदार आरोग्य सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळाव्यात, हा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना उद्योगविश्वाची साथ मिळाल्यास आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील, असे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi