Saturday, 29 August 2026

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून समितीच्या कामकाजा बाबत माहिती

 जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून समितीच्या कामकाजा बाबत माहिती


जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित केल्याचे सांगितले. रस्त्यांवरील खड्डे व साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला

.

वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार आहेत. तसेच दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमआयडीसी परिसरातील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्येही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            तसेच दीर्घकालीन उपाययोजना देखील त्यांनी सादर केल्या.


चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढी मोठी गुंतवणूक या भागात अपेक्षित आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत असून, राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

चाकण-भोसरी परिसरातील उद्योजक राज्याबाहेर स्थलांतरित होत असल्याच्या चर्चांना फेटाळून लावत, महाराष्ट्रातील एकही उद्योजक राज्याबाहेर गेलेला नसून उद्योजकांचा महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणावर आणि राज्य शासनावर पूर्ण विश्वास असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र · ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

 मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक

भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र

 

·         टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

 

मुंबई,दि. २९ : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना  टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले.

 

बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण ठरला. विविध बालगृहांमधून आलेली भावंडे एकमेकांना भेटताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा आणि एकमेकांच्या सहवासाची जाणीव अनुभवता आली. भावंडांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा दिवस आनंदात साजरा केला.

 

टीम अवर चिल्ड्रन्सच्या या उपक्रमामुळे बालकांना कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेचा अनुभव मिळाला. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद हाच या सोहळ्याचा खरा उद्देश व यश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

डिजिटल पेमेंट करत आहात?*

 *डिजिटल पेमेंट करत आहात?*


प्रत्येक डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी, खालील गोष्टी नक्की तपासा:


✅ ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे नाव, म्हणजेच लाभार्थ्याचे नाव

✅ तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम


डिजिटल पेमेंट करत राहा, फक्त... थोडे सावध राहा!!


आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !

WhatsApp सूचना थांबवायला 'stop' लिहा

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी - अन्न

 डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ


· प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि . २९ :- वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे. महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापन यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.


महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणारे प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांचा कार्य गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

 . चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

·         प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, दि . २९ :- वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ.  चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे. महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापन यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा  अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणारे प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांचा कार्य गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, डॉ. पुरंदरे हे केवळ उत्कृष्ट चिकित्सक नसून शिक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १४० हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. आत्मचरित्र म्हणजे केवळ कामांची यादी नसून एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश देणारा डॉ. पुरंदरे यांचा जीवनप्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मंत्री भुजबळ म्हणाले.

प्रा. डॉ. पुरंदरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेले कार्य हे केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून, महिला आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारे असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा लाभ असंख्य रुग्णांना झाला असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले डॉ. पुरंदरे यांनी त्यांच्या कामातून  जगभरात  ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनाचे विविध पैलू समोर येतील असे सांगत त्यांनी पुरंदरे कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.

नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी

 नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ

दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी

 

नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशा दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 

नागपूर येथे व्हीएसपीएम अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे १ हजार १३८ खाटांचे सूसज्ज रुग्णालय आहे.

तर अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेने असे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ८३० खाटांचे रुग्णालय देखील आहे.

या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार निरीक्षण समितीने पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात 

Featured post

Lakshvedhi