Saturday, 29 August 2026

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून समितीच्या कामकाजा बाबत माहिती

 जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून समितीच्या कामकाजा बाबत माहिती


जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित केल्याचे सांगितले. रस्त्यांवरील खड्डे व साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला

.

वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार आहेत. तसेच दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमआयडीसी परिसरातील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्येही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            तसेच दीर्घकालीन उपाययोजना देखील त्यांनी सादर केल्या.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi