Saturday, 4 July 2026

कॉरपोरेट, शैक्षणिक संस्थान और सरकारी विभाग दिव्यांगजनों के लिए रोजगार एवं कौशल विकास के अधिक अवसर उपलब्ध कराएं - राज्यपाल जिष्णु देव वर्मा ·

 कॉरपोरेट, शैक्षणिक संस्थान और सरकारी विभाग दिव्यांगजनों के लिए रोजगार एवं कौशल विकास के अधिक अवसर उपलब्ध कराएं - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         सीएसआर निधि में दिव्यांगजनों के लिए उप-कोटा होना चाहिए - पूर्व केंद्रीय सचिव लव वर्मा

·         दिव्यांगजनों के कौशल विकास हेतु विश्वस्तरीय विश्वविद्यालय स्थापित करेंगे - डॉ. जितेंद्र अग्रवाल

'विकसित भारत' का अर्थ एक समावेशी भारत है, जिसमें दिव्यांगजनों का सशक्तिकरण एक महत्वपूर्ण आधार है। कॉरपोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्थानों तथा सरकारी विभागों को दिव्यांगजनों के लिए रोजगार एवं कौशल प्रशिक्षण के अधिक अवसर सृजित कर उनके लिए अनुकूल एवं समावेशी वातावरण तैयार करना चाहिए। यह आह्वान महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया।

राज्यपाल ने कहा कि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) तथा आधुनिक प्रौद्योगिकी के क्षेत्र में हो रही प्रगति दिव्यांगजनों के लिए नए अवसरों के द्वार खोल रही है। किंतु प्रौद्योगिकी का वास्तविक उद्देश्य तभी सार्थक होगा, जब उसमें करुणा, मानवीय संवेदनशीलता और न्यायपूर्ण दृष्टिकोण का समावेश हो।

दिव्यांगजनों के कौशल विकास एवं सशक्तिकरण के लिए कार्यरत 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' के 18वें स्थापना दिवस समारोह में मुख्य अतिथि के रूप में संबोधित करते हुए राज्यपाल यह विचार व्यक्त कर रहे थे। यह समारोह को वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई में आयोजित किया गया था।

दिव्यांगांना कौशल्य देण्यासाठी जागतिक विद्यापीठ निर्माण करणार

 दिव्यांगांना कौशल्य देण्यासाठी जागतिक विद्यापीठ निर्माण करणार

आपण आपली दृष्टी गमावल्यानंतर वीस वर्षांपूर्वी 'सार्थक' संस्था सुरु केली त्या तुलनेत आज दिव्यांगांना कॉर्पोरेट, आदरातिथ्य, रिटेल, इ-कॉमर्स यांसह विविध क्षेत्रात संधी देण्यात येत आहेत तसेच अनेक संथांमधील कार्यस्थळ सर्वसमावेशक करण्यात येत आहेत ही आनंदाची बाब आहे. आता, दिव्यांगांना सीएसआर पॅनलमध्ये आणि त्याउपर निर्णायक मंडळावर (बोर्ड) घेऊन निर्णय प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे अशी अपेक्षा सार्थकचे संस्थापक डॉ जितेंदर अगरवाल यांनी यावेळी केली.

अनेक कंपन्यांना आज कुशल दिव्यांग उमेदवारांची गरज आहे,  परंतु पुरेसे कौशल्य प्रशिक्षित दिव्यांग उमेदवार उपब्लध नाही असे सांगून 'सार्थक' ही संस्था दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक विद्यापीठ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.        

यावेळी राज्यपालांनी दिव्यांगांच्या कौशल्य प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाला सिद्धार्थ काक, केंद्र शासनाचे माजी सचिव लव वर्मा, सार्थकचे संस्थापक डॉ जितेंदर अगरवाल, वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या संचालिका प्रिया पानसरे, संगीता जैन, दिव्यांग युवक युवती तसेच नॅशनल ऍबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.  

००००

दिव्यांगांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा व्हावी - सिद्धार्थ काक

 दिव्यांगांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा व्हावी - सिद्धार्थ काक

यावेळी बोलताना दूरदर्शनवरील 'सुरभी' कार्यक्रमाचे निवेदक व सार्थक संस्थेचे सल्लागार सिद्धार्थ काक यांनी दिव्यांगांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा व्हावी तसेच दिव्यांगांच्या कौशल्य प्रदर्शनासाठी होणाऱ्या 'ऍबिलिम्पिक' स्पर्धेसाठी जिल्ह्या-जिल्ह्यातून उमेदवारांची निवड व्हावी अशी अपेक्षा काक यांनी व्यक्त केली.  दिव्यांगांच्या कौशल्य प्रदर्शनामुळे लोकांचा दिव्यांगांप्रती असलेला दृष्टिकोन बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॉर्पोरेट, शिक्षण संस्था व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी रॊजगार, कौशल्य शिक्षणाच्या अधिक संधी निर्माण कराव्यात

 कॉर्पोरेट, शिक्षण संस्था व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी

रॊजगार, कौशल्य शिक्षणाच्या अधिक संधी निर्माण कराव्यात

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         सीएसआर निधीमध्ये दिव्यांगांसाठी सब कोटा असावा - माजी केंद्रीय सचिव

·         दिव्यांगांना कौशल्य देण्यासाठी जागतिक विद्यापीठ निर्माण करणार - डॉ जगदीश अगरवाल

मुंबई, दि. 3 : 'विकसित भारत' म्हणजे सर्वसमावेशक भारत असून त्यामध्ये दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा विचार अंतर्भूत आहे. कॉर्पोरेट, शिक्षण संस्था व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी रॊजगार व कौशल्य प्रशिक्षणाच्या अधिक संधी निर्माण करुन त्यांचेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. मात्र तंत्रज्ञानाला करुणा, माणुसकी व न्याय्य बुद्धीची जोड आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य प्रशिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एज्युकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ल्ड ट्रेंड सेंटर मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला पंतप्रधानांनी प्राधान्य दिले असून २०१६ मध्ये पारित झालेल्या दिव्यांग अधिकार कायद्यामुळे विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांना न्याय मिळाला आहे.  भारतात २.६८ कोटी व्यक्ती दिव्यांग असून महाराष्ट्रात ३० लाख लोक विविध प्रकारच्या अपंगत्वाने बाधित आहेत.  राज्य शासनातर्फे दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार, पुनर्वसन, सामाजिक सुरक्षा तसेच सुगम पोर्टलच्या माध्यमातून उपयुक्त कार्य केले जात आहे. मात्र दिव्यांगांचा समावेशी विकास ही एकट्या शासनाचीच नाही तर सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

यावेळी राज्यपालांनी दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल 'सार्थक'चे अभिनंदन केले. २०२७ साली फिनलँड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होत असलेल्या दिव्यांग स्पर्धकांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण सचिव लव वर्मा यांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीमध्ये दिव्यांगांसाठी उपवर्गवारी (सब-कोटा) असावी व निधीपैकी २ टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्याची तरतूद असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार

 जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे

 स्थानिक उद्योगांना गती मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबळगन, यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणाऱ्या उद्योगांचे महाराष्ट्र नेहमीच स्वागत करतो.

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील तीन उत्पादन केंद्रांद्वारे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने राज्यातील विशेषतः  दुर्गम तालुक्यांमध्ये रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. तसेच स्थानिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करताना विविध सामाजिक विकास उपक्रमांद्वारे राज्यातील सुमारे ४६ लाख नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे.

0000

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला शाश्वत, सुरक्षित आणि भविष्योन्मुख पाणीपुरवठा होणार

 पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला शाश्वत,

सुरक्षित आणि भविष्योन्मुख पाणीपुरवठा होणार

       पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण केले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील शुद्ध पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रदूषणमुक्त आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी मिळते. सध्याची पाण्याची मागणी सुमारे ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढ लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रस्तावित अंदाजानुसार २०३१ पर्यंत शहराची लोकसंख्या ५५ लाखांवर पोहोचण्याची शक्यता असून पाण्याची मागणी ९४९ एमएलडी होईल. २०४१ मध्ये लोकसंख्या ९५ लाखांवर गेल्यास मागणी १,६३८ एमएलडी आणि २०५१ मध्ये १३५ लाख लोकसंख्येसाठी २,३२८ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Featured post

Lakshvedhi