Thursday, 2 July 2026

गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा

 गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित  प्रस्ताव सादर करा

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबई, दि. १  : गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी  संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

 

गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस   विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित, हिकमत उढाण, राजेश विटेकर,  विभागीय आयुक्त,  तसेच बीड, परभणी आणि जालना जिल्हा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात

 बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

 

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक

 महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी बळकट करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या विविध बाबींवरही विचारविनिमय झाला.

 

बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

 

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

 मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा

महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

बंदरे मंत्री नितेश राणे

·         मुंद्रा पोर्टची पाहणी व महाराष्ट्रातील बंदरे विकासाबाबत चर्चा

 

मुंबई), दि. १  : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकासकामांची पाहणी करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक व आधुनिक बनविण्यासाठी मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार असल्याचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

या दौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा, जहाजांच्या जलद हालचालीसाठी विकसित करण्यात आलेली यंत्रणा तसेच विविध पायाभूत विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. बंदरातील कार्यक्षम नियोजन, वेगवान सेवा आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्टने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या भेटीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, खासगी गुंतवणुकीच्या संधी तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची वाढती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.


वाडी नगरपरिषदेच्या सांडपाण्याचा प्रश्न ३० ऑगस्टपर्यंत मार्गी लावणार

 वाडी नगरपरिषदेच्या सांडपाण्याचा प्रश्न ३० ऑगस्टपर्यंत मार्गी लावणार

– पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. १ : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील अंबाझरी तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याच्या प्रश्नावर राज्य शासनाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या असून, ११ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणीच तलावात सोडण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत सदस्य परिणय फुके यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संजय भेंडे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रमुख काम प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित संस्थांना नोटिसा देणे व पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याचा अधिकार मंडळाकडे नाहीत. त्यामुळे नगरपालिकांनी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे ही त्यांची जबाबदारी आहे.

वाडी नगरपरिषदेच्या ११ एमएलडी क्षमतेच्या एसटीपीचे सुमारे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते तलावात सोडले जाईल. त्यामुळे तलावातील प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळेल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.

तलावातील जलपर्णीच्या समस्येचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, घरगुती सांडपाण्यातील फॉस्फेटमुळे जलपर्णी वाढते. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था सुरू झाल्यानंतर या समस्येवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होईल. पर्यावरण विभागाच्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. नदी पुनरुज्जीवन, तलाव संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, उपलब्ध निधीनुसार ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.

हिंगणा एमआयडीसी तलावातील पाणी प्रक्रिया करून उद्योगांना पुरवत असल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, सध्या येणारे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याने त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे नगरपरिषदांची स्वतःची सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था सक्षम होणे अत्यावश्यक आहे.

प्रदूषण नियंत्रण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून नगरविकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरसह राज्यातील नद्या, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

नायगाव व ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पार्किंग सुविधांबाबत बैठक घेणार

 नायगाव व ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पार्किंग सुविधांबाबत बैठक घेणार

– राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबई, दि. १ : नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील दोन सदनिकांमागे एक वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. रहिवासी व लोकप्रतिनिधींच्या मागण्यानुसार पार्किंग सुविधांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

विधानपरिषदेत नियम ९३ अंतर्गत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य अनिल परब, प्रविण दरेकर, प्रमोद जठार, प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येत असून पुनर्वसन काम सुरू असून, दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित पुनर्वसन इमारतींपैकी चार इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. नायगाव येथे पहिल्या टप्प्यातील एकूण १,४०१ पुनर्वसन सदनिकांचे वाटप करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

ते म्हणाले की, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीपीआर-२०३४) नुसार प्रत्येक सदनिकेमागे वाहनतळ देण्याची तरतूद आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तिन्ही बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, वरळी प्रकल्पात उपलब्ध जागेमुळे अधिक वाहनतळाची व्यवस्था करणे शक्य झाले आहे. मात्र, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे जागेची मर्यादा असल्याने दोन कुटुंबांमागे एक वाहनतळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रभादेवीसह विविध पुनर्विकास प्रकल्पांमध्ये पार्किंग सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल. ज्या ठिकाणी अतिरिक्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य असेल, त्या ठिकाणी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाहणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, सदस्यांनी उपस्थित केलेल्या दुचाकी वाहनांच्या पार्किंगच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्यास त्याची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. चारचाकी वाहनांप्रमाणेच दुचाकींसाठीही योग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विभाग स्तरावर प्रक्रिया राबविण्यात येईल, असे डॉ. भोयर यांनी सांगितले.

विदर्भात पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणुकीत मोठी प्रगती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणुकीत मोठी प्रगती होत असून भविष्यात विदर्भावर पुन्हा विकासाचा अनुशेष निर्माण होणार नाही, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi