Monday, 11 May 2026

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा

 पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा

 

मुंबईदि. ७ राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्तपशुसंवर्धन गट च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबईछत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार असल्याचे नमूद केले आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवापशुधन आरोग्य तपासणीलसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीखूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहातती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट ’ या पदासाठी २७९५ तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट ’ या पदासाठी ३०८ जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. ११ जून २०२६ रोजी ही परीक्षा आहे. एवढे सर्व अधिकारी पशुसंवर्धन खात्यात रुजू झाल्यानंतर विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होईल.

 

            या भरतीमुळे राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेला मोठे बळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करून या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

द्विपक्षीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरण, आर्थिक सहकार्य वाढविणे, पायाभूत सुविधा

 द्विपक्षीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरणआर्थिक सहकार्य वाढविणेपायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणेकौशल्य विकासाला चालना देणे आणि गुंतवणूक प्रक्रियेत अधिक सुलभता आणणे या प्रमुख बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी सांगितले. व्यापार क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घ्यावाअसेही ते म्हणाले. भारतीय उद्योगांना व्हिएतनाममध्ये अधिक गुंतवणूक करण्याचे आणि अनुभव व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे

 भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे

-       राष्ट्राध्यक्ष तो लाम

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उद्योगतंत्रज्ञानपायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी या फोरममध्ये बोलताना केले.

मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित हा कार्यक्रम भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत आर्थिक सहकार्यजागतिकीकरणातील नव्या संधी आणि विश्वासार्ह भागीदारीचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहनेपायाभूत सुविधातंत्रज्ञान सेवाऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक भारतीय उद्योग व्हिएतनाममध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असून हे सहकार्य भविष्यातील व्यापार आणि उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट 

मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, गडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या

 मुंबईनवी मुंबईछत्रपती संभाजीनगरपुणेनागपूरगडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक संधींबद्दल माहिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योगऊर्जाऔषधनिर्माणमाहिती तंत्रज्ञानपर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण क्षेत्र जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता राज्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र-व्हिएतनाम व्यावसायिक परिषद दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मांडला. व्हिएतनामच्या प्रतिनिधींच्या मुंबईतील पहिल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून

 ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून  नागरिकांना आकाशात बाबासाहेबांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडले. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर होत असूनअशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          या ड्रोन शो-द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. सुमारे २००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या प्रकाशचित्रांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे प्रभावीपणे उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये साकारण्यात आली. महामानवाने घडविलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवासही या ड्रोन शोमधून जिवंत करण्यात आला.

यावेळी गायिका वैशाली माडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दया, क्षमा आणि शांतीचे मूल्य

 सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दयाक्षमा आणि शांतीचे मूल्य दिले. समानतासमान संधी आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित त्यांचा विचार आजही मार्गदर्शक ठरत आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्या तत्त्वज्ञानातच दडलेली आहे. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असूनत्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्थाप्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश ड्रोनच्या भव्य रोषणाईतून

 आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश

ड्रोनच्या भव्य रोषणाईतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच

सर्वसमावेशक विकास शक्य

-         मंत्री संजय शिरसाट

 

मुंबईदि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षणसमानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले असूनत्यांच्या विचारांचा प्रभाव आजही प्रत्येकाच्या जीवनात जाणवतो. समाजातील पुढील पिढीपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे प्रथमच ड्रोन शो व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

Featured post

Lakshvedhi