Friday, 1 May 2026

 १ ते ८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह

-राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ३० : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर “संकल्प सप्ताह” प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध, तपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

या मोहिमेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सप्ताहात विविध विषयांवर आधारित उपक्रम राबविले जाणार असून, नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आठवडाभर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in,

 'घर-यादी आणि गृहगणना' या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक ज्यावेळी घरी भेट देतील त्यावेळी स्व-गणना डेटाची पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी सामायिक करणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in, ला भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

स्वगणना करणाऱ्या नागरिकांनी हे सुनिश्चित करावे की ते https://se.census.gov.in या योग्य युआरएल ऍड्रेसलाच भेट देत आहेत तसेच ज्या एसएमएस /ई-मेल श्रेणीतून वन टाइम पासवर्ड (ओटीपी ) प्राप्त झाला आहे, त्याची सत्यता पडताळून पाहावी.

एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतो, उदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.

0000

जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षितअधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल.

 मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली की, भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावर, एक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडी) तयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

स्व-गणना करणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही; माहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्येक घरी भेट देतील असे डांगे यांनी सांगितले.

स्व-गणना पर्यायांतर्गत व्यक्ती त्यांची माहिती स्वतःच ऑनलाईन स्वरुपात https://se.census.gov.in येथे भरु शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा गणनाकार तुमच्या घरी भेट देतील, तेव्हा हा एसई आयडी त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.

जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 

•              महाराष्ट्राने जनगणना 2027 साठी 1 मे ते 15 मे 2026 कालावधी दरम्यान स्व-गणना पोर्टल केले सुरु

•        स्व-गणना ऐच्छिक असून बंधनकारक नाही, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी दिली माहिती

•              महाराष्ट्रात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्येक घरी देणार भेट

 

मुंबई, दि. 30 : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल.

देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल, ज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली की, भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावर, एक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडी) तयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.


 पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असून, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

 

 दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.

 

‘आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.

आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ

 पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असून, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले

 दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.


‘आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत

आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम

 ‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत;

तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम

– मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबई, दि. ३० : राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असून, प्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित बनविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत.

 

या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Featured post

Lakshvedhi