Friday, 1 May 2026

जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 

•              महाराष्ट्राने जनगणना 2027 साठी 1 मे ते 15 मे 2026 कालावधी दरम्यान स्व-गणना पोर्टल केले सुरु

•        स्व-गणना ऐच्छिक असून बंधनकारक नाहीमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी दिली माहिती

•              महाराष्ट्रात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्येक घरी देणार भेट

 

मुंबईदि. 30 : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईलआणि सादर करता येईल.

देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईलज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठीघर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारीडॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली कीभारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावरएक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडीतयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi