Tuesday, 7 April 2026

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी’ ‘सरस’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींच्या वर ‘रेकॉर्डब्रेक’ उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

 उदंड प्रतिसादाने महालक्ष्मी’ ‘सरस’ प्रदर्शनाची सांगता;

२२ कोटींच्या वर रेकॉर्डब्रेक’ उलाढाल

  • ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने
  • स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

 

 मुंबईदि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंधकष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाने निरोप घेताना यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. १३ दिवसांत तब्बल २२ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्योजकतेचा नवा इतिहास लिहिला.

मुंबईकरांनी ४९० स्टॉल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला एक भक्कम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागराचा महापूर लोटलाज्यामुळे आयोजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त' ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत


जागतिक आरोग्य दिनानिमित्त' ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात


डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 6 : 'जागतिक आरोग्य दिनाच्या' निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सिकलसेल ॲनिमिया या विषयावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.


'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. ही मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.


जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि सिकलसेल आणि ॲनिमियासारख्या आजारांविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा परिणाम प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. विजय कंदेवाड यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व, रुग्ण व वाहकांची ओळख, गर्भावस्थेतील तपासणी तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.


X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR


Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR


YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR


०००

आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू

 सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसाचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

 नोव्हेंबरमध्ये मुंबईत चित्रपताका’ चित्रपट महोत्सव

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

 

मुंबईदि. ६ : राज्य शासनाचा अधिकृत चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवीमुंबई येथे आयोजित करण्यात येईलअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

            सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवीमुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी माहिती दिली. या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णीव्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटीलसह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकरउपसचिव नंदा राऊत तसेच उपसचिव महेश वाव्हळ उपस्थित होते.

आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेच्या अंकाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते प्रकाशन

 आपलं मंत्रालयगृहपत्रिकेच्या अंकाचे

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते प्रकाशन

 

 मुंबईदि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या  गृहपत्रिकेच्या मार्च 2026 अंकाचे प्रकाशन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक डॉ. किशोर गांगुर्डे उपस्थित होते.

त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक

 मुले हे देशाचे भविष्य आहेतत्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होउन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहेअसे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी महत्वाचे योगदान दिले असून मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांनाविशेषतः रुग्णांनातातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.

या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी

 या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेसार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वमध्ये देणार आहे. अशा या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होतात. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi