Tuesday, 7 April 2026

जागतिक आरोग्य दिनानिमित्त' ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत


जागतिक आरोग्य दिनानिमित्त' ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात


डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 6 : 'जागतिक आरोग्य दिनाच्या' निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सिकलसेल ॲनिमिया या विषयावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.


'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. ही मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.


जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि सिकलसेल आणि ॲनिमियासारख्या आजारांविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा परिणाम प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. विजय कंदेवाड यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व, रुग्ण व वाहकांची ओळख, गर्भावस्थेतील तपासणी तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.


X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR


Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR


YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi