Tuesday, 7 April 2026

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी’ ‘सरस’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींच्या वर ‘रेकॉर्डब्रेक’ उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

 उदंड प्रतिसादाने महालक्ष्मी’ ‘सरस’ प्रदर्शनाची सांगता;

२२ कोटींच्या वर रेकॉर्डब्रेक’ उलाढाल

  • ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने
  • स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

 

 मुंबईदि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंधकष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाने निरोप घेताना यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. १३ दिवसांत तब्बल २२ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्योजकतेचा नवा इतिहास लिहिला.

मुंबईकरांनी ४९० स्टॉल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला एक भक्कम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागराचा महापूर लोटलाज्यामुळे आयोजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi