मेट्रो सेवेत कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले असून, सध्या ८० टक्के तिकीट व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. स्मार्ट कार्ड आणि ‘वन कार्ड’ प्रणालीमुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळत आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाईटिंग आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हरित प्रकल्प ठरत आहे. तसेच नागपूरप्रमाणेच मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर उभारण्याची डबल डेकर रचना येथेही वापरण्यात आली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 7 April 2026
दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ६,६०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीराभाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद
मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ७ : दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.
योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळा
योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळा, संस्था आणि शिक्षक यांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. लहान वयातच त्यांच्या कलेला दिशा दिल्यास ते केवळ चांगले कलाकारच नव्हे, तर आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून घडतात. दिव्यांग मुलांच्या कलेला प्रोत्साहन देणे ही केवळ कुटुंबाची किंवा संस्थांची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. त्यांच्या कलाकृतींना दाद देणे, प्रदर्शनांना भेट देणे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे हीच खरी त्यांच्यासाठी प्रेरणा ठरते.
दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव
दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव हे त्यांच्या कलेतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे रंग त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडतात. कधीकधी एक साधे चित्रही त्यांच्या मनातील खोल विचार आणि भावना व्यक्त करून जाते. शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी असूनही ही मुल कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख
कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी सर्जनशीलता. ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत या कलाकारांनी कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कलाकारांनी सूक्ष्म तपशीलांनी परिपूर्ण चित्रे रेखाटली. प्रत्येकाच्या कलेत त्यांचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन दिसून येत होता. त्यांच्या प्रत्येक रेषेत एक प्रयत्न, प्रत्येक रंगात एक जिद्द आणि प्रत्येक चित्रात मीही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास दिसत होता.
मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या
मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा (IASOWA) आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था (NIEPID) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकारांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत, आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली आहे. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्थां सहभागी झाल्या. या उपक्रमामागे आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...