Tuesday, 7 April 2026

मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद

 मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरूमुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ७ : दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक,  कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाबृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडेआमदार प्रवीण दरेकरआमदार संजय उपाध्यायमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi