Tuesday, 7 April 2026

लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक

 लवकर निदानपरवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक

या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्चाची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपला सहभाग  नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये  कर्करोगाचे  उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार • मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

•       मुख्यमंत्री सहाय्यता कक्षबीपीसीएल फाऊंडेशन आणि

टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि.६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे  तसेचप्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असूनअंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

झिरोधाची दीर्घकालीन पर्यावरण बांधिलकी

 झिरोधाची दीर्घकालीन पर्यावरण बांधिलकी

झिरोधा ही कंपनी आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी देत आहे. २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रेन मॅटर फाऊंडेशन मार्फत हवामान कृतीपरिसंस्था पुनर्संचयशाश्वत उपजीविका आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला याद्वारे चालना देण्यात येत आहे.

२०२५ मध्ये १५ व्या वर्धापनदिनानिमित्त झिरोधाने झिरोधा रिवाईंड फंडची घोषणा केली असूनदेशभरातील अधोगती झालेल्या भूभागाच्या पुनर्संचयासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी झिरोधामार्फतरेनमॅटर फाउंडेशनच्या सहकार्याने राबविला जाणार असून मोठ्या प्रमाणावर रीवाइल्डिंग उपक्रमांना चालना देण्याचा उद्देश आहे. या फंडच्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Monday, 6 April 2026

व्यापक प्रादेशिक संवर्धन प्रयत्नांचा भाग

 व्यापक प्रादेशिक संवर्धन प्रयत्नांचा भाग

हा प्रकल्प पूर्व महाराष्ट्रातील सुरू असलेल्या संवर्धन उपक्रमांना पूरक ठरणार आहे. २०२१ पासून फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्था सुमारे २ लाख हेक्टर वनक्षेत्रशेती क्षेत्र आणि सामुदायिक जमिनीवर कार्यरत आहे. जंगल संरक्षणपुनर्वनीकरणसमुदाय सहभागरस्त्यावर नाट्यप्रयोगांद्वारे जनजागृतीअग्नि व्यवस्थापनऊर्जा कार्यक्षम चुलींचे वितरण आणि अधिवास सुधारणा अशा विविध माध्यमांतून मानवीवन्यजीव संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवीन भागीदारीमुळे संस्थात्मक क्षमता आणि तांत्रिक साधनसंपत्ती वाढणार असून ताडोबा परिसरातील पर्यावरण पुनर्संचय प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.

रीवाइल्डिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये

 रीवाइल्डिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या सामंजस्य करारानुसार पुढील उद्दिष्टे साध्य होणार आहेत  :

·         राखीव क्षेत्राभोवती ८०० एकरांहून अधिक अधोगती झालेल्या जमिनीचे पुनर्संचय

·         पुनर्संचय उपक्रमसामुदायिक रोपवाटिका आणि पर्यावरणीय देखरेखीद्वारे १५,००० पेक्षा अधिक ग्रामीण रोजगार दिवसांची निर्मिती

·         १०० हून अधिक स्थानिक वृक्षझुडुपे व गवत प्रजातींची लागवड आणि संवर्धन, ज्यामुळे भक्ष्य प्रजाती व इतर वन्यजीवांना अधिवास उपलब्ध होईल

प्रकल्पाची रचना केवळ पारंपरिक वृक्षलागवडीपुरती मर्यादित नसून परिसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया पुनर्संचयित करणेअधिवासांची जटिलता वाढविणे आणि विविध भूप्रकारांमध्ये वन्यजीवांना मुक्तपणे वावरण्यास सक्षम करणेया व्यापक उद्दिष्टांवर आधारित आहे.

वाघांव्यतिरिक्त बिबटे, रानकुत्रे (ढोले), अस्वल, गवा, विविध हरिण प्रजाती, साप (यामध्ये संकटग्रस्त भारतीय अजगर) आणि १९५ हून अधिक पक्षीप्रजाती

 वाघांव्यतिरिक्त बिबटेरानकुत्रे (ढोले)अस्वलगवाविविध हरिण प्रजातीसाप (यामध्ये संकटग्रस्त भारतीय अजगर) आणि १९५ हून अधिक पक्षीप्रजाती येथे आढळतात. त्यामुळे मध्य भारतातील जैवविविधतेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मात्रवाघसंख्येतील वाढ आणि बफर क्षेत्रातील मानवी वस्ती यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत आहे. तसेच विकासामुळे अधिवास तुकड्यात विभागले जाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे एकात्मिक आणि समुदायाभिमुख पुनर्संचय उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

जैवविविधतेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू

 जैवविविधतेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मानला जातो. सुमारे १,७२७ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलांचे मुख्य आणि बफर क्षेत्र समाविष्ट आहे. येथे वाघांची संख्या लक्षणीय असून राखीव क्षेत्रात ८० हून अधिक वाघ असल्याचा अंदाज आहे. गेल्या दशकात या परिसरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.


Featured post

Lakshvedhi