Tuesday, 7 April 2026

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार • मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

•       मुख्यमंत्री सहाय्यता कक्षबीपीसीएल फाऊंडेशन आणि

टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि.६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे  तसेचप्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असूनअंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi