Saturday, 4 April 2026

अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा -

 अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

मुंबईतील सहकार भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

 

मुंबईदि.२७ : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊनप्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रोळीतील कन्नमवार नगरयेथील मुंबई हाउसिंग फेडरेशन लि. संचालित सेवामार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उद्घाटन व प्रतीक्षानगरसायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घ्या कोलू फिरवण्याचा अनुभव; क्रांतिकारकांचा अपार त्याग अनुभवण्याची अनमोल संधी

 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घ्या कोलू फिरवण्याचा अनुभवक्रांतिकारकांचा अपार त्याग अनुभवण्याची अनमोल संधी

अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरत्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेल पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्या केलीउल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले.'दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढालहेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. पण असंख्य क्रांतिकारकांच्या अपार त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्याचं हे मोलक्रांतिकारकांच्या यातना जाणून घेण्याची संधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने उपलब्ध केली आहे. भारतमातेच्या सुपुत्रांनी भोगलेल्या असह्य यातनांचा अनुभव राष्ट्रप्रेमी स्वतः कोलू चालवून घेऊ शकतात. या निमित्ताने युवा पिढीला खरा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

बंदीवानांना ८-८ तास कोलू फिरवावा लागत असलातरी त्याचा थोडासा अनुभव म्हणून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावायासाठी पायांत बेड्या घालूनच हा कोलू फिरवायचा आहे. दादरमुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवार ४ आणि रविवार ५ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी कोणतीही शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पायात बेड्या घालायच्या असल्याने फूलपँट / सलवार घालून यावेजेणेकरून पायाला इजा होणार नाही,

गूगल फॉर्मची लिंक - https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6

कोलू फिरवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येणार आहे. तसेच स्मृती म्हणून कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमानंतर २ दिवसांनंतर सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर १० एप्रिल २०२६

 मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर

मुंबई, दि. 1  : प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून उपनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeeVvJ-mq0y4H2n_UXiF4tQiNy7UM0AdA3BbMGfZdWTY2iEQA/viewform या लिंकवर 10 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षण, पोषण व पूरक आहार, भोजन व्यवस्था, क्रीडा साहित्य व गणवेश, वैद्यकीय तपासण्या तसेच देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२६ असून निवड चाचणीची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. उमेदवारांनी निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी  पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा मार्क धरमाई  ८८९८०९०९०७. प्रीती टेमघरे  ९०२९२५०२६८अभिजीत गुरव  ८१०८६१४९११मनीषा गारगोटे  ८२०८३७२०३४, तसेच ई-मेल: mishanlakshvedhmumsub@gmail.com यावर संपर्क साधावा. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026

 पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’

                                -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात स्थानिक लोककलापारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण

 

मुंबईदि. 1 :  शासनाचा पर्यटन विभागजिल्हा प्रशासन सातारा आणि विभागीय पर्यटन संचालनालयपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणजि. सातारा येथे 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेलअशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या महोत्सवात नागरिकशेतकरीपर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

 मुख्यमंत्री  यांच्या हस्ते  एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

 

मुंबईदि. १ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभपारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे. याच  दिशेने ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारपरिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व  मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरेतसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के अवसर पर वर्षभर विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए हैं।

 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के अवसर पर वर्षभर विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए हैं।

 

मुंबई, 1 अप्रैल: 11 अप्रैल 2026 से 10 अप्रैल 2027 तक का कालखंड महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के रूप में मनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह उनके कार्य और विचारों को अगली पीढ़ी तक प्रभावी रूप से पहुंचाने का एक महत्वपूर्ण अवसर है। उन्होंने उनके जीवन और कार्यों पर आधारित कार्यक्रमों की वार्षिक दिनदर्शिका तैयार कर वर्षभर सफल आयोजन करने के निर्देश दिए।

मंत्रालय में आयोजित द्विशताब्दी जयंती वर्ष समारोह के लिए गठित समिति की बैठक में मुख्यमंत्री यह निर्देश दे रहे थे। बैठक में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारखाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबळसांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशीष शेलारसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेस्कूल शिक्षा मंत्री दादाजी भुसेग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे तथा महिला एवं बाल विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित थे।

अनेकदा खत विक्रेते युरिया किंवा डीएपी सोबत बायो-स्टीम्युलंट, कीटकनाशके

 कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीअनेकदा खत विक्रेते युरिया किंवा डीएपी सोबत बायो-स्टीम्युलंटकीटकनाशके किंवा इतर उत्पादने घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करतात. "खतांचे उत्पादन व विक्री ही 'खत नियंत्रण आदेश १९८५आणि 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५अंतर्गत नियमित केली जाते. जर कोणत्याही कंपनीने किंवा विक्रेत्याने खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती केलीतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई  करण्यात येईल.

बैठकीला  कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे  सहायक महाव्यवस्थापक समाधान बुधवत, इंडियन पोटॅश लिमिटेड, परादीप फॉस्फेट्स लिमिटेडचेअनिल चिंतावरफर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे एस. पी. शेळकेडॉ. एम. एस. पोवार,जे. टी. भामरे,आर. जी. नाईक उपस्थित होते


Featured post

Lakshvedhi