Saturday, 4 April 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घ्या कोलू फिरवण्याचा अनुभव; क्रांतिकारकांचा अपार त्याग अनुभवण्याची अनमोल संधी

 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घ्या कोलू फिरवण्याचा अनुभवक्रांतिकारकांचा अपार त्याग अनुभवण्याची अनमोल संधी

अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरत्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेल पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्या केलीउल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले.'दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढालहेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. पण असंख्य क्रांतिकारकांच्या अपार त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्याचं हे मोलक्रांतिकारकांच्या यातना जाणून घेण्याची संधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने उपलब्ध केली आहे. भारतमातेच्या सुपुत्रांनी भोगलेल्या असह्य यातनांचा अनुभव राष्ट्रप्रेमी स्वतः कोलू चालवून घेऊ शकतात. या निमित्ताने युवा पिढीला खरा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

बंदीवानांना ८-८ तास कोलू फिरवावा लागत असलातरी त्याचा थोडासा अनुभव म्हणून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावायासाठी पायांत बेड्या घालूनच हा कोलू फिरवायचा आहे. दादरमुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवार ४ आणि रविवार ५ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी कोणतीही शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पायात बेड्या घालायच्या असल्याने फूलपँट / सलवार घालून यावेजेणेकरून पायाला इजा होणार नाही,

गूगल फॉर्मची लिंक - https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6

कोलू फिरवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येणार आहे. तसेच स्मृती म्हणून कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमानंतर २ दिवसांनंतर सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi