Saturday, 4 April 2026

पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026

 पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’

                                -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात स्थानिक लोककला, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण

 

मुंबई, दि. 1 :  शासनाचा पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा आणि विभागीय पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण, जि. सातारा येथे 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या महोत्सवात नागरिक, शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi