Thursday, 2 April 2026

साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मराठीसाठी प्रदीप कोकरे यांना प्रदान

 साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

मराठीसाठी प्रदीप कोकरे यांना प्रदान

 

नवी दिल्ली,  दि. १ साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्हशाल आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. कोकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षितअकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मासचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मान्यताप्राप्त २३ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले. त्यात मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना  'खोल खोल दुष्काळ डोळे या रचनेसाठी हा सन्मान जाहीर झाला होता.

महा लक्ष्मी सरस प्रदर्शन नागरिकांची वाढती मागणी आणि महिलांचा उत्साह लक्षात घेऊन प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात

 नागरिकांची वाढती मागणी आणि महिलांचा उत्साह लक्षात घेऊन प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले. वाढीव कालावधीत अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कष्टांना प्रोत्साहन द्यावेअसे आवाहन उमेद अभियानामार्फत करण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

ग्रामीण भागातील हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, पारंपरिक वस्तूंना, खाद्यपदार्थ यांना ग्राहकांची मोठी पसंती

 ग्रामीण भागातील हस्तकलासेंद्रिय उत्पादनेपारंपरिक वस्तूंना,  खाद्यपदार्थ यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून,  मुंबईसारख्या बाजारपेठेत मिळालेली ही पसंती ग्रामीण  महिलांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.

महिला उद्योजिकांच्या कौशल्यपूर्ण उत्पादनाचा ४९० स्टॉल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ही ‘स्टार्टअप

 महाराष्ट्राच्या चांद्यापासून ते बांदयापर्यंतच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजिकांच्या कौशल्यपूर्ण उत्पादनाचा ४९० स्टॉल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ही स्टार्टअप क्रांती’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. अवघ्या सात दिवसांत सुमारे ९ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल करत या प्रदर्शनाने नवा उच्चांक गाठला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी सादर केलेल्या उत्पादनांना नवी मुंबईकरांनी दिलेला भरघोस प्रतिसाद यामागे महत्त्वाचा घटक ठरला आहे.

 

ग्रामीण भागातील हस्तकलासेंद्रिय उत्पादनेपारंपरिक वस्तूंना,  खाद्यपदार्थ यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून,  मुंबईसारख्या बाजारपेठेत मिळालेली ही पसंती ग्रामीण  महिलांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.

उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार

 उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 28 :  महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची

 मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी (self-care) हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. तज्ज्ञांनी नमूद केले की, मानसिक आरोग्य ज्ज्ञ देखिल माणूस असल्यामुळे रुग्णांच्या समस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे सेल्फ केअर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कार्यस्थळ, कुटुंब आणि समाज यांनीही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

या सत्रात NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी

 या सत्रात NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.

सत्रात मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी (self-care) हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. तज्ज्ञांनी नमूद केले की, मानसिक आरोग्य ज्ज्ञ देखिल माणूस असल्यामुळे रुग्णांच्या समस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे सेल्फ केअर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कार्यस्थळ, कुटुंब आणि समाज यांनीही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

Featured post

Lakshvedhi