Thursday, 2 April 2026

साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मराठीसाठी प्रदीप कोकरे यांना प्रदान

 साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

मराठीसाठी प्रदीप कोकरे यांना प्रदान

 

नवी दिल्ली,  दि. १ साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्हशाल आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. कोकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षितअकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मासचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मान्यताप्राप्त २३ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले. त्यात मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना  'खोल खोल दुष्काळ डोळे या रचनेसाठी हा सन्मान जाहीर झाला होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi