महाराष्ट्राच्या चांद्यापासून ते बांदयापर्यंतच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजिकांच्या कौशल्यपूर्ण उत्पादनाचा ४९० स्टॉल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ही ‘स्टार्टअप क्रांती’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. अवघ्या सात दिवसांत सुमारे ९ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल करत या प्रदर्शनाने नवा उच्चांक गाठला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी सादर केलेल्या उत्पादनांना नवी मुंबईकरांनी दिलेला भरघोस प्रतिसाद यामागे महत्त्वाचा घटक ठरला आहे.
ग्रामीण भागातील हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, पारंपरिक वस्तूंना, खाद्यपदार्थ यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून, मुंबईसारख्या बाजारपेठेत मिळालेली ही पसंती ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.
No comments:
Post a Comment