Sunday, 1 March 2026

 हिंद-दी-चादर कार्यक्रमात भाविकांसाठी

विविध सोयीसुविधा उपलब्ध

 

नवी मुंबईदि. २८ :  भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूकसुरक्षाआपत्ती व्यवस्थापनआरोग्य सेवास्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक मार्गयोजना आखण्यात आली असूनपोलीस विभागामार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. सीसीटीव्ही यंत्रणानियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सायबर पोलीस व एटीएस यांचीही मदत घेण्यात आली आहे.

 

आरोग्य सेवांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी  तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व एक अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला असूनजवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथकेरुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १०० पेक्षा अधिक डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.

 

ओवे मैदानाची एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असूनमुख्य मंडपात ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असूनपाणीपुरवठावीजपुरवठाप्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची कामे प्रगतीपथावर आहेत. १ हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.

 

देशभरातून भाविक येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जेएनपीए परिसरात दररोज होणाऱ्या सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनपोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३८ स्वतंत्र पार्किंग स्थळे३ हेलिपॅड२५ हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

 

लंगर व्यवस्थेसाठी सुमारे १ हजार गॅस सिलेंडरआवश्यक इंधन व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत

https://gurutegbahadurshahidi.com/home संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असूनभाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 


मिहान विकासासाठी ५९७ कोटींची मंजुरी; २९७ कोटी वितरित

 मिहान  विकासासाठी ५९७ कोटींची मंजुरी२९७ कोटी वितरित

मिहान येथे अनेक उद्योग व प्रकल्प कार्यान्वित झाले असूनपतंजली आयुर्वेदचाही प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरकमर्शियल कॉम्प्लेक्समहाराष्ट्र अॅग्रो डेव्हलपमेंट कंपनीमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरसेझबाह्य क्षेत्रातील हेल्थकेअर सुविधाकार्गो हब आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-व्ही चार्जिंग स्टेशन यांसारख्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली.

मिहानच्या सर्वांगीण विकासासाठी ५९७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असूनत्यापैकी २९७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १२ कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा ३९ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प उभारण्यात येत आहे. शिवणगाव आणि वित्तुबाबानगर परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील विमानतळ व औद्योगिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे गुंतवणूकरोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेलअशी माहिती यावेळी देण्यात आली.

00000

17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीजपाणीरस्तेआरोग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.

पायाभूत सुविधांबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, रस्तेरेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जोडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलत आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी संधींची भूमी’ बनत आहे असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशापासून समृद्धी मिळविण्याची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गतसरकार छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रूपयांची मदत देतेअसेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबाला समृद्ध जीवन मिळेल अशा "विकसित राजस्थानपासून विकसित भारत" या मंत्राचा पुनरुच्चार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या विकास प्रवासातील या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले.

देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा

 देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 

मुंबईदि. 28  :- भारताच्या नारी शक्तीला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका असून संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गौरवोद्गगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीदवारे उपस्थित होते. यावेळी 'वर्षानिवासस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ अशिष जयस्वालअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायकप्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, कुटुंबात आई आजारी पडली तर संपूर्ण घर विस्कळीत होते. आई निरोगी असेल तर कुटुंब कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे उज्ज्वला गॅस योजनासॅनिटरी पॅड उपलब्धता आणि शौचालय उभारणी यांसारख्या मिशन मोड’ उपक्रमांचा उल्लेख करुन ते म्हणालेसुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक आहारासाठी महिलांच्या खात्यात 5,000 रुपये जमा केले जात आहेत.

बकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार व आधुनिकीकरणाचा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्हा देशातील महत्त्वपूर्ण स्टील उद्योग केंद्र म्हणून विकसित होत असून, या औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी तेथे लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे वाढती वाहतूक आणि लॉजिस्टिक गरजा लक्षात घेता आधुनिक विमानतळ सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार व आधुनिकीकरणाचा आढावा घेण्यात आला. प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील नऊ विमानतळांच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

 राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

 

मुंबई, दि.२८ : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या बंदराला रस्तारेल्वे आणि वायुमार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी समन्वयित पावले उचलली जात आहेत. वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीने जागा निश्चिती करण्यात यावीतसेच राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

विधिमंडळातील समिती कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या संचालक मंडळाची ९३ वी बैठक पार पडली.

17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीजपाणीरस्तेआरोग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.

पायाभूत सुविधांबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, रस्तेरेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जोडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलत आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी संधींची भूमी’ बनत आहे असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशापासून समृद्धी मिळविण्याची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गतसरकार छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रूपयांची मदत देतेअसेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबाला समृद्ध जीवन मिळेल अशा "विकसित राजस्थानपासून विकसित भारत" या मंत्राचा पुनरुच्चार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या विकास प्रवासातील या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले.

Featured post

Lakshvedhi