17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.
पायाभूत सुविधांबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जोडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलत आहे. “दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी ‘संधींची भूमी’ बनत आहे” असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशापासून समृद्धी मिळविण्याची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत, सरकार छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रूपयांची मदत देते, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबाला समृद्ध जीवन मिळेल अशा "विकसित राजस्थानपासून विकसित भारत" या मंत्राचा पुनरुच्चार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या विकास प्रवासातील या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले.
No comments:
Post a Comment