Sunday, 1 March 2026

देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा

 देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 

मुंबईदि. 28  :- भारताच्या नारी शक्तीला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका असून संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गौरवोद्गगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीदवारे उपस्थित होते. यावेळी 'वर्षानिवासस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ अशिष जयस्वालअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायकप्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, कुटुंबात आई आजारी पडली तर संपूर्ण घर विस्कळीत होते. आई निरोगी असेल तर कुटुंब कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे उज्ज्वला गॅस योजनासॅनिटरी पॅड उपलब्धता आणि शौचालय उभारणी यांसारख्या मिशन मोड’ उपक्रमांचा उल्लेख करुन ते म्हणालेसुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक आहारासाठी महिलांच्या खात्यात 5,000 रुपये जमा केले जात आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi