Sunday, 1 March 2026

वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

 राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

 

मुंबई, दि.२८ : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या बंदराला रस्तारेल्वे आणि वायुमार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी समन्वयित पावले उचलली जात आहेत. वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीने जागा निश्चिती करण्यात यावीतसेच राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

विधिमंडळातील समिती कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या संचालक मंडळाची ९३ वी बैठक पार पडली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi