Sunday, 1 February 2026

जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चा

 जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगीक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते. यातून एमएसएमई क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसेच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे.

दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनच ‘मॅग्नेटिक’; उद्योग, गुंतवणूकदारांच्या आवर्जून भेटी

 दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनच ‘मॅग्नेटिक’; उद्योग, गुंतवणूकदारांच्या आवर्जून भेटी

दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिल्याचे चित्र होते. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

दरम्यान, दावोस दौऱ्यावर आलेल्या भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनच ‘मॅग्नेटिक’; उद्योग, गुंतवणूकदारांच्या आवर्जून भेटी

दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिल्याचे चित्र होते. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

दरम्यान, दावोस दौऱ्यावर आलेल्या भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या.


रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती

 रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती

नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु करु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करण्यात येत  आहे. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाले आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरितील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.

शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्य

 शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्य

राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रय़त्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपल्याला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करण्याचा प्रय़त्न. त्यासाठी जगातील अशी सुविधा उभ्या करणाऱ्या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आला आहे.

तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

 तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

 

 

दावोस, दि. 21 :- स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.

आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग – सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार केले आहेत. यातून एक प्रकारे केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारितीने काम करता येईल. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची सरंचना चांगल्या रितीने करता येणार आहे.

दावोस दौऱ्यातून नॉलेज-ज्ञान, टेक्नॉलॉजी-तंत्रज्ञान आणि एफडीआय-विदेशी गुंतवणूक मिळविता येते. त्याचा देशाला आणि पर्यायाने राज्याला मोठा फायदा होतो. यंदा नागरी क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्याशी संवाद, समन्वय साधता आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

भरड धान्य पिक संवर्धन, आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 भरड धान्य पिक संवर्धन, आव्हाने,

 गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

     एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरड धान्य पिकांपुढील प्रमुख आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधी यावर सादरीकरण केले. यानंतर महिला शेतकऱ्यांचे थेट अनुभव ऐकून घेण्यात आले, ज्यामध्ये शेतीतील वास्तव अडचणी, ओळख, बाजारपेठ आणि संसाधनांपर्यंत पोहोच याबाबत त्यांनी आपले मत मांडले.

         ओडिशा मिलेट मिशनकडून मिळालेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून राज्यस्तरीय मिलेट उपक्रम यशस्वीपणे कसे राबवता येतात, याबाबत माहिती देण्यात आली. या सादरीकरणात राज्यातील विस्तार यंत्रणेची भूमिका आणि संधी स्पष्ट केल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत एनएआरपी, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील एनएआरपीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवार, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर. एस. इंगोले यांनी संशोधन, बियाणे विकास आणि क्षेत्रीय अंमलबजावणीवरील अनुभव मांडले.

        राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआर, हैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवती, बाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधन, सुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटी, हैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

                                                ००००

महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना

 “महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक आणि पाठिंबा देणारे आहेत,” असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. हवामान बदलामुळे शेतीपुढील अडचणी , संरचनात्मक अडथळ्यांचा सामना याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

         बीड येथील द्वारकाताई वाघमारे,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील वैशाली घुगे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शांताबाई वारवे या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. दैनंदिन शेतीमधील अडचणी शासनाने करावयाच्या उपाययोजना याबाबत मते मांडली.

         विदी लीगल सेंटर आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी  यांची स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि संभाव्य धोरणात्मक व कार्यक्रमात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. महिला शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याबाबतही चर्चा झाली.


Featured post

Lakshvedhi