Sunday, 1 February 2026

भरड धान्य पिक संवर्धन, आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 भरड धान्य पिक संवर्धनआव्हाने,

 गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

     एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरड धान्य पिकांपुढील प्रमुख आव्हानेगरजा आणि भविष्यातील संधी यावर सादरीकरण केले. यानंतर महिला शेतकऱ्यांचे थेट अनुभव ऐकून घेण्यात आलेज्यामध्ये शेतीतील वास्तव अडचणीओळखबाजारपेठ आणि संसाधनांपर्यंत पोहोच याबाबत त्यांनी आपले मत मांडले.

         ओडिशा मिलेट मिशनकडून मिळालेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आलेज्यातून राज्यस्तरीय मिलेट उपक्रम यशस्वीपणे कसे राबवता येतातयाबाबत माहिती देण्यात आली. या सादरीकरणात राज्यातील विस्तार यंत्रणेची भूमिका आणि संधी स्पष्ट केल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी अंतर्गत एनएआरपीकोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराडतसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी येथील एनएआरपीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवारमुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर. एस. इंगोले यांनी संशोधनबियाणे विकास आणि क्षेत्रीय अंमलबजावणीवरील अनुभव मांडले.

        राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआरहैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवतीबाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधनसुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटीहैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

                                                ००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi