Thursday, 11 September 2025

समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित ‘सेवा पंधरवडा’ लोकाभिमुख करावा

 समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित

‘सेवा पंधरवडा’ लोकाभिमुख करावा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

----

महसूली विभागांचा पूर्वतयारीबाबत आढावा

 

मुंबई दि१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती  ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाने या अभियानाची तयारी सुरू केली असून पाणंद रस्तेसर्वांसाठी घरे आणि स्थानिक आवश्यकतेनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम असे या अभियानाचे स्वरूप असेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे विभागीय आयुक्तांकडून या अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी लोकसहभाग आणि व्यापक प्रसिद्धीवर विशेष भर दिला.

            महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले हे अभियान सर्वसमावेशक होण्यासाठी पंचायत ते पार्लमेंट मधील सर्व लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करून घ्यावे ग्रामसभेपर्यंत पोहोचून पंधरवड्याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी यासाठी विविध प्रसार माध्यमांची देखील मदत घ्यावी अभियानादरम्यान केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करून उत्स्फूर्तपणे हे अभियान राबवावे.

जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

 राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी

सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

 

मुंबईदि. १० : भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली. ही परिषद नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे घेण्यात आली.

 

या परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू व डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या SIR तयारीचे सविस्तर परीक्षण केले.

 

परिषदेत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे अनुभवधोरणेअडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केलेजेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

 

सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्याशेवटच्या SIR ची पात्रता दिनांकतसेच मतदार यादीतील माहिती सादर केली. याशिवायमागील SIR नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटायझेशन व वेबसाइटवर अपलोड स्थितीही मांडण्यात आली.

 

त्याचप्रमाणेविद्यमान मतदारांची शेवटच्या SIR मधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहेयाची माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२०० मतदार असावेतयाकरिता मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला.

 

मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही व अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाहीयासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचे व्हावेयावर विशेष भर देण्यात आला.

 

याशिवायजिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), EROs, AEROs, BLOs आणि BLAs यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाची स्थितीही आयोगाने तपासली असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट,ठळक वैशिष्ट्ये,उपक्रमाचे महत्त्व

 प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट

नागपूर येथील औष्णिक संशोधन केंद्रानंतर राज्यात सीपीआरआयने नाशिकमध्ये ही प्रयोगशाळा स्थापित केली  आहे. देशाच्या पश्चिम भागातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रदान केलेल्या १०० एकर जागेत ही विस्तारली आहे. ट्रान्सफॉर्मरएनर्जी मीटरस्मार्ट मीटरट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर पॉवर उपकरणांचे उत्पादक येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील.

इथे असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये ऑनलाइन शॉर्ट सर्किट टेस्ट स्टेशनएनर्जी मीटर टेस्ट लॅबोरेटरीट्रान्सफॉर्मर रूटीन टेस्ट सुविधातापमान वाढ चाचणी सुविधा८०० केव्ही ८० केजे इम्पल्स व्होल्टेज चाचणी सुविधाट्रान्सफॉर्मर ऑइल चाचणी सुविधेचा समावेश आहे.

प्रयोगशाळेची ठळक वैशिष्ट्ये

नाशिकमध्ये स्थित ही सुविधा भारताच्या पश्चिम भागातील उद्योग आणि उपयुक्त सेवा देण्यासाठी निर्माण  केलेली आहे. ही प्रयोगशाळा भारत सरकारच्या आत्मनिर्भरच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते. स्वदेशी चाचणी आणि प्रमाणन क्षमता वाढवून भारत उत्पादकांसाठी चाचणी आणि प्रमाणन वेळ लक्षणीयरीत्या कमी केला जाईल. यामुळे जलद उत्पादन विकास आणि बाजारपेठ प्रवेशाला प्रोत्साहन मिळणार आहे. ही सुविधा आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणार आहे. जागतिक स्तरावरील कामगिरी आणि विश्वासार्हता बेंचमार्क सुनिश्चित करणार आहे. उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढवेल. तसेच वीज क्षेत्रातील उत्पादनांची गुणवत्ता वाढवेल.

उपक्रमाचे महत्त्व

आरटीएल नाशिकचे उद्घाटन भारताच्या वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही सुविधा गुणवत्तासुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान देईल आणि महत्त्वपूर्ण वीज उपकरणांची विश्वासार्हतापरदेशी चाचणी सेवांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल. नवोपक्रमाला चालना मिळेल आणि देशभरातील विजेच्या जाळ्याच्या विस्ताराला पाठिंबा मिळेलअशी अपेक्षा आहे.


प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट

 प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट

नागपूर येथील औष्णिक संशोधन केंद्रानंतर राज्यात सीपीआरआयने नाशिकमध्ये ही प्रयोगशाळा स्थापित केली  आहे. देशाच्या पश्चिम भागातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रदान केलेल्या १०० एकर जागेत ही विस्तारली आहे. ट्रान्सफॉर्मरएनर्जी मीटरस्मार्ट मीटरट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर पॉवर उपकरणांचे उत्पादक येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील.

इथे असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये ऑनलाइन शॉर्ट सर्किट टेस्ट स्टेशनएनर्जी मीटर टेस्ट लॅबोरेटरीट्रान्सफॉर्मर रूटीन टेस्ट सुविधातापमान वाढ चाचणी सुविधा८०० केव्ही ८० केजे इम्पल्स व्होल्टेज चाचणी सुविधाट्रान्सफॉर्मर ऑइल चाचणी सुविधेचा समावेश आहे.

प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील

 प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अन्ननागरी पुरवठा मंत्री मंत्री श्री.भुजबळ म्हणालेप्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा विद्युत सुरक्षा आणि संशोधन तसेच उद्योगाला चालना देणारे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. विद्युत क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पश्चिम क्षेत्रात कार्यरत आहेतत्यांच्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल. परदेशातील उन्नत प्रयोगशाळांमधील सुविधा या प्रयोगशाळेत आहेत. सोबत नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ आणि दळणवळण सुविधा असल्याने विद्युत क्षेत्रातील मोठे उद्योग इथे आकर्षित होतील आणि नाशिकच्या विकासाला गती मिळेल. परदेशात विद्युत उपकरणे निर्यात करण्यासाठी त्यांचे नमुने परिक्षणासाठी इतर राज्यात पाठवावे लागत होते. नाशिक हे इलेक्ट्रिकल हब बनवायचे आहे. कृषी प्रक्रीया करणारे आणि प्रदूषणमुक्त उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसोबत नाशिकच्या वैभवात भर पडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पश्चिम भारतातील उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरटीएल उपयुक्त

 

पश्चिम भारतातील उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरटीएल उपयुक्त

- केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर

ऊर्जा क्षेत्राचे प्राण असलेली ही प्रयोगशाळा असल्याचे नमूद करून केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. खट्टर म्हणालेघरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीची विद्युत उपकरणे सूक्ष्म तपासणीनंतर उपयोगात येतात. गुणवत्ता तपासणीच्या आधारे ऊर्जा क्षेत्रातील प्रत्येक उपकरण तयार केले जाते. अशा तपासणीसाठी आरटीएल महत्वाची असून ती पश्चिम भारतातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही अत्याधुनिक प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा विज्ञान आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट प्रतीक आहे.

महाराष्ट्रात प्री-पेड स्मार्ट मीटरचा उपयोग सुरू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करून ते म्हणालेस्मार्ट मीटरच्या उपयोग करणाऱ्यांसाठी वीज देयकात १० टक्के सूट देण्याचा राज्य शासनाचा निर्णयही स्तुत्य आणि इतर राज्यांना मार्गदर्शक आहे. ट्रान्सफॉर्मरएनर्जी मीटरस्मार्ट मीटरट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर वीज उपकरणांचे उत्पादक येथे देण्यात येणाऱ्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील. भारत आणि दुबईमधील विद्युत वाहिन्या समुद्राखालून जात असल्याने त्यासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण आणि अणुऊर्जासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण महत्वाचे आहे. उद्योग विश्वाला विश्वास वाटेल असे परिक्षण येथे होईलअसा विश्वास श्री.खट्टर यांनी व्यक्त केला.

‘उद्योगाचे जंक्शन’ म्हणून नाशिकचा विकास

 ‘उद्योगाचे जंक्शन’ म्हणून नाशिकचा विकास

नाशिक जिल्हा गुंतवणूकीचे प्रमुख केंद्र होत आहे. गेल्या सहा महिन्यात सात मोठ्या उद्योगसंस्थांनी इथे गुंतवणूक केली आहे. खाणकाम उद्योगातील उपकरणे नाशिकमध्ये तयार होणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून नाशिकची ओळख प्रस्थापित होत आहे. नाशिकपासून जेएनपीटीपर्यंत उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहेवाढवण बंदराशीही नाशिक जोडले जाणार असल्याने ‘उद्योगाचे जंक्शन’ म्हणून नाशिकचा भविष्यात विकास होईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi