पश्चिम भारतातील उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरटीएल उपयुक्त
- केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर
ऊर्जा क्षेत्राचे प्राण असलेली ही प्रयोगशाळा असल्याचे नमूद करून केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. खट्टर म्हणाले, घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीची विद्युत उपकरणे सूक्ष्म तपासणीनंतर उपयोगात येतात. गुणवत्ता तपासणीच्या आधारे ऊर्जा क्षेत्रातील प्रत्येक उपकरण तयार केले जाते. अशा तपासणीसाठी आरटीएल महत्वाची असून ती पश्चिम भारतातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही अत्याधुनिक प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा विज्ञान आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट प्रतीक आहे.
महाराष्ट्रात प्री-पेड स्मार्ट मीटरचा उपयोग सुरू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करून ते म्हणाले, स्मार्ट मीटरच्या उपयोग करणाऱ्यांसाठी वीज देयकात १० टक्के सूट देण्याचा राज्य शासनाचा निर्णयही स्तुत्य आणि इतर राज्यांना मार्गदर्शक आहे. ट्रान्सफॉर्मर, एनर्जी मीटर, स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर वीज उपकरणांचे उत्पादक येथे देण्यात येणाऱ्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील. भारत आणि दुबईमधील विद्युत वाहिन्या समुद्राखालून जात असल्याने त्यासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण आणि अणुऊर्जासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण महत्वाचे आहे. उद्योग विश्वाला विश्वास वाटेल असे परिक्षण येथे होईल, असा विश्वास श्री.खट्टर यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment