Thursday, 11 September 2025

प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील

 प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अन्ननागरी पुरवठा मंत्री मंत्री श्री.भुजबळ म्हणालेप्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा विद्युत सुरक्षा आणि संशोधन तसेच उद्योगाला चालना देणारे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. विद्युत क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पश्चिम क्षेत्रात कार्यरत आहेतत्यांच्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल. परदेशातील उन्नत प्रयोगशाळांमधील सुविधा या प्रयोगशाळेत आहेत. सोबत नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ आणि दळणवळण सुविधा असल्याने विद्युत क्षेत्रातील मोठे उद्योग इथे आकर्षित होतील आणि नाशिकच्या विकासाला गती मिळेल. परदेशात विद्युत उपकरणे निर्यात करण्यासाठी त्यांचे नमुने परिक्षणासाठी इतर राज्यात पाठवावे लागत होते. नाशिक हे इलेक्ट्रिकल हब बनवायचे आहे. कृषी प्रक्रीया करणारे आणि प्रदूषणमुक्त उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसोबत नाशिकच्या वैभवात भर पडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi