प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट
नागपूर येथील औष्णिक संशोधन केंद्रानंतर राज्यात सीपीआरआयने नाशिकमध्ये ही प्रयोगशाळा स्थापित केली आहे. देशाच्या पश्चिम भागातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रदान केलेल्या १०० एकर जागेत ही विस्तारली आहे. ट्रान्सफॉर्मर, एनर्जी मीटर, स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर पॉवर उपकरणांचे उत्पादक येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील.
इथे असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये ऑनलाइन शॉर्ट सर्किट टेस्ट स्टेशन, एनर्जी मीटर टेस्ट लॅबोरेटरी, ट्रान्सफॉर्मर रूटीन टेस्ट सुविधा, तापमान वाढ चाचणी सुविधा, ८०० केव्ही ८० केजे इम्पल्स व्होल्टेज चाचणी सुविधा, ट्रान्सफॉर्मर ऑइल चाचणी सुविधेचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment