Thursday, 11 September 2025

समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित ‘सेवा पंधरवडा’ लोकाभिमुख करावा

 समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित

‘सेवा पंधरवडा’ लोकाभिमुख करावा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

----

महसूली विभागांचा पूर्वतयारीबाबत आढावा

 

मुंबई दि१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती  ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाने या अभियानाची तयारी सुरू केली असून पाणंद रस्तेसर्वांसाठी घरे आणि स्थानिक आवश्यकतेनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम असे या अभियानाचे स्वरूप असेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे विभागीय आयुक्तांकडून या अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी लोकसहभाग आणि व्यापक प्रसिद्धीवर विशेष भर दिला.

            महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले हे अभियान सर्वसमावेशक होण्यासाठी पंचायत ते पार्लमेंट मधील सर्व लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करून घ्यावे ग्रामसभेपर्यंत पोहोचून पंधरवड्याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी यासाठी विविध प्रसार माध्यमांची देखील मदत घ्यावी अभियानादरम्यान केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करून उत्स्फूर्तपणे हे अभियान राबवावे.

जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi