Thursday, 11 September 2025

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

 राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी

सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

 

मुंबईदि. १० : भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली. ही परिषद नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे घेण्यात आली.

 

या परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू व डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या SIR तयारीचे सविस्तर परीक्षण केले.

 

परिषदेत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे अनुभवधोरणेअडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केलेजेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

 

सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्याशेवटच्या SIR ची पात्रता दिनांकतसेच मतदार यादीतील माहिती सादर केली. याशिवायमागील SIR नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटायझेशन व वेबसाइटवर अपलोड स्थितीही मांडण्यात आली.

 

त्याचप्रमाणेविद्यमान मतदारांची शेवटच्या SIR मधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहेयाची माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२०० मतदार असावेतयाकरिता मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला.

 

मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही व अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाहीयासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचे व्हावेयावर विशेष भर देण्यात आला.

 

याशिवायजिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), EROs, AEROs, BLOs आणि BLAs यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाची स्थितीही आयोगाने तपासली असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi