Saturday, 6 September 2025

विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

 राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापिआधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.

राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 2 कोटी 4 लाख 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत यापैकी 1 कोटी 91 लाख 35 हजार 296 विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. उर्वरित पाच लाख 27 हजार 602 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. तर, 63 हजार 009 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. तसेच, 7 लाख 37 हजार 485 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

 राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;

उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

मुंबईदि. : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापिआधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी · ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून

आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

·         ,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

मुंबई, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेचनागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षमहात्मा फुले जन आरोग्य योजनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयेजिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’

 पाणंद रस्तेसर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी सेवा पंधरवडा

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 4 : महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली .

       छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते.

       याबाबत अधिक माहिती देताना महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम हे यापूर्वीच राबविण्यात येत असून पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे कार्यक्रम आहेत. तथापिया कालावधीत मोहीम स्वरुपात युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहेत. हे अभियान पाणंद रस्तेविषयक मोहीम, सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन नाविन्यपूर्वक उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

Friday, 5 September 2025

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

 त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील

समिती सदस्यांची नियुक्ती

 

मुंबईदि. ५ : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्षभाषा सल्लागार समिती)डॉ. वामन केंद्रे, (संचालकनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञपुणे)श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुखडेक्कन कॉलेजपुणे)डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञछत्रपती संभाजीनगर)डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञपुणे) हे सदस्य तरसंजय यादव, (राज्य प्रकल्प संचालकसमग्र शिक्षा अभियानमुंबई) हे सदस्य सचिव असतील.

 

उपरोक्त समिती दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणांसंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.


आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार

 आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

 

मुंबई,दि. ५ : विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता "डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" या नावाने देण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

डॉ. जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययनअध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरिता निवड प्रक्रियेच्या अटी, निकष कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कारार्थी


पुरस्कारासाठी अंतिम केंद्रीय छाननी समिती रचना


            समिती सदस्य : अध्यक्ष- कुलगुरू, सदस्य- उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय सदस्य असतील तर दोन विषय तज्ञ सहसंचालक, उच्च शिक्षण (मुख्यालय) हे सदस्य सचिव असतील.


राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती


समितीचे अध्यक्ष - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्ष - उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, सदस्य अपर मुख्य सचिव,राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ञ,सदस्य-सचिव संचालक, उच्च शिक्षण हे असणार आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथे ५ सप्टेंबर १९०७ रोजी जन्मलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक हे भारतीय शिक्षण क्षेत्राचे दीपस्तंभ मानले जातात. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचले असून युनेस्कोनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. शिक्षण क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या या महान विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे. या निर्णयातून शिक्षकांचा सन्मान अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

 Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

Mumbai Dated 5 : Acting Chief Justice of the High Court of Bombay Justice Shree Chandrashekhar was today sworn in as the Chief Justice of the Bombay High Court.

            Maharashtra Governor C. P. Radhakrishnan administered the oath of office to Chief Justice Shree Chandrashekhar at a brief swearing-in ceremony held at Darbar Hall in Raj Bhavan Mumbai on Friday (5 Sept).  

            After countersigning the oath signed by the Chief Justice, the Governor presented a bouquet of flowers to the Chief Justice and congratulated him. The Chief Minister also congratulated the Chief Justice.


 


Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha, Minister of Protocol Jaykumar Rawal, judges of the Jharkhand, Rajasthan, Delhi, Allahabad and Bombay High Court, retired judges and senior government officers were present.


 


            Earlier Chief Secretary Rajesh Kumar read out the Notification of Appointment of the Chief Justice issued by Government of India.


 


            The swearing in ceremony started with the rendition of the National Anthem and State Song and concluded with the playing of the National Anthem by the police band.


 

Featured post

Lakshvedhi