Sunday, 15 August 2021

 स्वतंत्र कला विद्यापीठासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा

                                                     -मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलर्स ऑफ इंडिपेंडन्स75 इयर्स ऑफ आर्ट

या ऑनलाईन प्रदर्शनाचे उद्घाटन


            मुंबई दिनांक 14: राज्यात कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही आपली सुरुवातीपासूनची इच्छा असून हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दि बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावात्यास शासन पूर्ण सहकार्य
 करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

            दि बॉम्बे आर्ट सोसायटी आयोजित कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: 75 इयर्स ऑफ आर्ट या ऑनलाईन कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य अशाच सुंदर रंगांने बहरत जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी होत असतांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे नाव मुंबई आर्ट सोसायटी असे केले जावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

            कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेदि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलउपाध्यक्ष रामदास फुटाणेसचिव चंद्रजित यादव यांच्यासह विविध देशातीलभारताच्या विविध 29 राज्यातील आणि महाराष्ट्रातील कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्रशिल्पमुद्राचित्रफोटोग्राफीव्हिडिओ इन्स्टॉलेशन यासारख्या कलाप्रकारातील 1645 कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट ते 30 डिसेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संकेतस्थळावर पहाता येईल.

            सोसायटीने ज्या दिग्गज कलाकारांच्या नावे पारितोषिके सुरु केली त्यातील काही कलावंतांना कलानगरमध्ये मला पहायला मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  कलाकार आपल्या कलेतून स्वत: आनंद घेतोच परंतू प्रेक्षकाकडून त्याला जेंव्हा दाद मिळते तेंव्हा त्याचे समाधान त्याला अधिक मिळते. मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा सामना करतांना कलाकारांची काही प्रमाणात कोंडी झाली असली तरी बॉम्बे आर्ट सोसायटीने देश विदेशातील कलाकारांसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आपल्याला आनंद आहे. आज बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीरामदास फुटाणे यांनी  आर्ट कौन्सीलची स्थापना असेलअनुदान देणे असेल किंवा मालमत्ता करात सवलत देण्याचा विषय असेल त्या संदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यासाठी येत्या आठ दिवसात बैठक आयोजित करून निर्णय घेऊ.  यासंदर्भात जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            कलाकाराचे स्वत:चे एक विश्व असतेत्याला कधी लॉकडाऊन लागू शकत नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीआपली कला कशाप्रकारे सादर करायची याचे त्याला स्वातंत्र्य असतेकारण क्रियेटिव्हीटीला कुठलीच बंधने नसतात आणि नसावीत. कलाकारांना त्यांची कलाकृती लोकांसमोर आणायला सहज सोपा मार्ग असावा असेही ते म्हणाले.

            कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  आयोजित केलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनाचे स्वरूपसहभागी कलाकार आणि त्याची वैशिष्ट्येसोसायटीतर्फे दिली जाणारी पारितोषिके याची माहिती दिली. उपाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आपल्या भाषणात एका कलाकाराच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, सोसायटीपुढे अनेक अडचणी आहेतत्या दूर करणे गरजेचे आहेइतर संस्थांप्रमाणे शासनाने या बॉम्बे आर्ट सोसायटीलाही अनुदान द्यावे.

            प्रो. नरेंद्र विचारे यांनी आर्ट कौन्सील स्थापन केल्यास सर्व कला संस्थांच्या कामात सुलभता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस शौर्यराष्ट्रपती पोलीस पदक,

अग्निशमन शौर्य पदक विजेत्यांचे अभिनंदन

 

केंद्रीय गृहमंत्रालयाची स्वातंत्र्यदिन पुर्वसंध्येला पदकांची घोषणा

 

            मुंबईदि. 14 : - पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदकराष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

             “महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागूनया अधिकारीकर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

            केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 1,380 पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 अधिकाऱीकर्मचाऱ्यांनी 'पोलीस शौर्य पदक'  तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी  39  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोलीस पदक’ तसेच 11 पोलीस अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारीकर्मचाऱ्यांना 'अग्निशमन सेवा शौर्य पदकजाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहेतसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.

0000

Saturday, 14 August 2021

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमिताने

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा

 

          मुंबई, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्न अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या बाबीविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावेऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्याचे स्थान कायम रहावेया उद्देशाने ज्ञान, प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

          या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. quiz75news@gmail.com या ई-मेलवर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. आकाशवाणीच्या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मदरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल.

          या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याच आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000

 


 ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या

स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

 

            मुंबईदि. 14 :- 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचे कांस्यपदक जिंकून देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीला सातासमुद्रापार गौरव मिळवून देणाऱ्याऑलिंपिकमधल्या भारताच्या आजच्या यशाची पायाभरणी सत्तर वर्षांपूर्वी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रासपैलवान खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. 

             

००००

 

स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली

 

            मुंबईदि. 14 :- महाराष्ट्राच्या राजकारणातले सदाबहारहसतमुखदिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी कृषीउद्योगव्यापारशिक्षणआरोग्यसहकारकलाक्रीडासंस्कृती अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेले. पायाभूत सुविधा उभारताना महाराष्ट्राचा प्रगतपुरोगामीसुधारणावादी विचार जाणीवपूर्वक जपला. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. सर्वांना सोबत घेऊन राज्याला पुढे नेणारे सर्वमान्यअजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.

            स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतपुढे केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचाकठोर परिश्रमांचा होता. या प्रदीर्घ प्रवासात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खांशी समरस होऊन त्यांनी काम केले. जनतेला  मदतीसाठी सहज उपलब्ध होऊ शकणारे ते नेते होते. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीप्रशासकीय कौशल्य होते. नेतृत्ववक्तृत्वकर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. मुंबई महानगराच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील पुरोगामीप्रगतसंवेदनशीलसुसंस्कृत महाराष्ट्र घडवणेहीच त्यांना खरी आदरांजली ठरेलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया राबविण्यासाठी सज्जता

          मुंबईदि.१४: अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणेपुणेनागपूर, अमरावती आणि नासिक शहरातील सुमारे साडे पाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.

          पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता  येणार आहे.  दि. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टलातिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरलाचौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना 
https://11thadmission.org.in
या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

०००० 

 महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

         

          मुंबईदि. 14 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

          राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

          51 हजार रुपयेप्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.

पुरस्कार खालीलप्रमाणे :

वर्ष-2019 –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप काळे, संपादक, दै.युथ सकाळ. मुंबई.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – अंजया अनपरतीविशेष प्रतिनिधी, दै. टाइम्स ऑफ इंडिया. नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – फरहान हनीफ, उपसंपादक, दै. उर्दू न्यूज, मुंबई.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) – प्रवीण टाकेजिल्हा माहिती अधिकारीचंद्रपूर.

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- वेदांत नेबप्रतिनिधी, एबीपी माझा, मुंबई.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- प्रशांत खरोटे, वरिष्ठ छायाचित्रकार, दै. लोकमतनाशिक.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर)-रोहीत कांबळे, छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)- राहुल झोटे, संपादक, सिंदखेड राजा मिरर.इन (वेब), बुलढाणा.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)-प्रतिभा राजे, उपसंपादक, दै. पुढारीसातारा.

 

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार- रोहिणी खाडिलकर-पोतनीस, संपादक, दै. संध्याकाळ, मुंबई. (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

दादासाहेब पोतनीस पुरस्कारनाशिक विभाग- मनोज शेलारवरिष्ठ उपसंपादक,

दै. लोकमतनंदुरबार, नाशिक.

अनंतराव भालेराव पुरस्कारऔरंगाबाद विभाग (लातूरसह)- महेश जोशीविशेष प्रतिनिधी, दै. दिव्य मराठीऔरंगाबाद.

आचार्य अत्रे पुरस्कारमुंबई विभाग –सचिन लुंगसेवरिष्ठ वार्ताहर, दै. लोकमतमुंबई.

नानासाहेब परूळेकर पुरस्कारपुणे विभाग – चैत्राली चांदोरकर, वरिष्ठ पत्रकार,

दै. महाराष्ट्र टाइम्सपुणे

शि. म. परांजपे पुरस्कारकोकण विभाग – हर्षद कशाळकरजिल्हा प्रतिनिधी,

दै. लोकसत्तारायगड.

ग. गो. जाधव पुरस्कारकोल्हापूर विभाग – एकनाथ नाईक, उपसंपादक, दै. पुढारीकोल्हापूर.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कारअमरावती विभाग – जयंत सोनोनेवार्ताहर, 

दै. दिव्य मराठी, अमरावती.

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कारनागपूर विभाग – योगेश पांडेउपमुख्य उपसंपादक-वार्ताहर, दै. लोकमतनागपूर.

          2019 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती)  यांचा समावेश होता.

००००

 

 -फसल सर्वेक्षण परियोजना देश के लिए बनेगी मार्गदर्शक

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई13 अगस्त: आने वाले समय में ई-फसल सर्वेक्षण मोबाइल एप (एप्लिकेशन) किसानों को अपना लगने लगेगाइस बाबत विश्वास है। पूरे राज्य में लागू होने वाली ई-फसल सर्वेक्षण परियोजना देश के लिए एक मार्गदर्शक साबित होगीऐसा भी विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया है।

            आने वाले स्वतंत्रता दिवस से राजस्व और कृषि विभाग द्वारा लागू की जाने वाली संयुक्त परियोजना ई-फसल सर्वेक्षण का उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के करकमलों द्वारा सह्याद्री गेस्ट हाउस में "ई-फसल सर्वेक्षण" ("ई-पीक पाहणी") परियोजना का ऑनलाइन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक बटन दबाकर किया गया।

            मोबाइल एप का ऑनलाइन लोकार्पण करने के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ साल पहले किसानों को अपना सातबारा (7/12 इक्स्ट्रैक्ट) देखने के लिए काफी मेहनत करनी पड़ती थीलेकिन आज किसानों के लिए उनका सातबारा मोबाइल में देखना संभव हो गया है। समय के हिसाब से प्रकृति का नियम बदलता है। ऐसा हम कहते हैं। परंतु बदलाव के समय आधुनिक तकनीक की मदद से हम प्रयोग कर किसानों की कठिनाइयों को कम करने के साथ-साथ उन्हें सरल और सुलभ तरीके से आवश्यक दस्तावेज को उपलब्ध करानेफसलों की जानकारी मुहैया करने पर जोर दिया जा रहा है। इस बात की भी ख़ुशी है। किसी भी तरह का नया प्रयोग करते समय सफलता तभी मिलती है जब हम सभी लोग सामूहिक प्रयास करते हैं। हम सभी ने सामुहिक प्रयास किया है इसलिए अब हमारे किसान भाइयों की पीड़ा को कम करने में मदद मिलेगी।

कम से कम गारंटीकृत कीमत (एमएसपी) नहीं तो एक निश्चित कीमत (अशुर्ड प्राइस) देने पर जोर

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि  जो बिकेगावही उगेगा’ (विकेल ते पिकेल) की संकल्पना को पूरे राज्य में लागू किया गया है। इसे लागू करते समय ही प्रत्येक जिले की विशेषताओं को पहचानते हुए एक जिलाएक फसल का ब्रांड तैयार करना आवश्यक है। तभी ही किसानों को उसकी फसल का कम से कम गारंटीकृत कीमत (एमएसपी) नहीं तो एक निश्चित कीमत मिलेगी।

          आने वाले दिनों में किसानों द्वारा उगाई जाने वाली सब्जियां ज्यादा दिनों तक कैसे चल सकेंगीइस बाबत प्रयास किया जाना आवश्यक है। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और हरित क्रांति के प्रणेता वसंतराव नाइक ने कृषि में समय से आगे जाकर प्रयास किया है। उसी तरह से अब भी किसानों को नई बातों और तकनीक की मदद से उनका जीवन सरल और सुलभ करने पर जोर देना आवश्यक है।

                

 

ई-फसल सर्वेक्षण परियोजना को प्रत्येक परिवार से जोड़ा जाएगा

- बालासाहेब थोरात

            राजस्व मंत्री श्री. बालासाहेब थोरात ने कहा कि पूरे महाराष्ट्र में लागू किया गया भले ही यह एक पायलट प्रोजेक्ट है लेकिन आज का दिन ऐतिहासिक है। ई-फसल सर्वेक्षण परियोजना एक ऐसी परियोजना है जिसे हर परिवार को जोड़ा जाएगा। भले ही आज आयोजित किए गए कार्यक्रम का स्वरूप सीमित हैलेकिन इसका प्रभाव दूरगामी होने वाला है। शुरुआत में  टाटा ट्रस्ट के माध्यम से इस परियोजना को सिर्फ दो जिलों में एक पायलट परियोजना के रूप में शुरू किया गया थालेकिन अब इसे पूरे राज्य में लागू किया जाएगा। इस परियोजना की मदद से किसानों को उनके फसल की जानकारी स्वयं भरने में सक्षम करेगी। आज शुरू हुई इस परियोजना को राज्य स्तर पर लागू किया जाएगा। उसी तरह से अगले 15 दिनों में राज्य के किसानों को ऐप पर उन्हें उनके फसल का पंजीकरण कैसे करना हैइस बात प्रशिक्षण दिया जाएगा। ऑनलाइन सात बारा सुलभता से उपलब्ध होने के साथ-साथ अब 8 अ को भी ऑनलाइन किया गया है।

            कृषि मंत्री श्री दादा भूसे ने कहा कि ई-फसल सर्वेक्षण परियोजना को राज्य भर में राजस्व एवं कृषि विभाग द्वारा संयुक्त रूप से लागू किया जाएगा और इसका उद्देश्य 'जो बिकेगावही उगेगा’ (विकेल ते पिकेल) अभियान के माध्यम से किसानों की आय में वृद्धि करना है। किसान स्वयं अपनी फसल का पंजीयन करा सकेंगे और खेती के लिए फसल ऋण एवं फसल बीमा की सुविधा आसानी से उपलब्ध होने में मदद मिलेगी।

          राजस्व राज्य मंत्री श्री. अब्दुल सत्तार ने कहा कि चूंकि किसान को सात बारा अपनी फसल का स्वयं ही रिकॉर्ड कर सकेंगेइससे वे बुवाई और फसल की परिस्थिति का अनुमान लगा सकेंगे। ई-फसल सर्वेक्षण परियोजना के माध्यम से गांवतहसील (तालुका) और जिलावार तरीके से प्रत्येक फसल के क्षेत्रफल को अनुमान लगाया जा सकेगा।

Featured post

Lakshvedhi