Sunday, 15 August 2021

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस शौर्यराष्ट्रपती पोलीस पदक,

अग्निशमन शौर्य पदक विजेत्यांचे अभिनंदन

 

केंद्रीय गृहमंत्रालयाची स्वातंत्र्यदिन पुर्वसंध्येला पदकांची घोषणा

 

            मुंबईदि. 14 : - पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदकराष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

             “महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागूनया अधिकारीकर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

            केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 1,380 पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 अधिकाऱीकर्मचाऱ्यांनी 'पोलीस शौर्य पदक'  तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी  39  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोलीस पदक’ तसेच 11 पोलीस अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारीकर्मचाऱ्यांना 'अग्निशमन सेवा शौर्य पदकजाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहेतसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi