Sunday, 8 August 2021

 बरेच लोक मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी जातात.  ही उपयुक्त माहिती आहे.  कृपया ते जतन करा:


  * डीमार्ट * * डी मार्ट चे प्रमोटर  राधाकिशन दमानी यांनी * गोपाळ हवेली * येथे * ए * मेट्रो सिनेमा क्वीन्स रोड मुंबई जवळ एक सुविधा बांधली असून मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांसाठी rooms 53 खोल्या आहेत.  काल त्याचे उद्घाटन झाले.  हे खूप छान केले गेले आहे.  हितचिंतकांच्या अशा कोणत्याही वास्तविक गरजेचा उल्लेख केला जाऊ शकतो.

  पत्ता:

  गोपाळ हवेली

  50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

  मेट्रो सिनेमा जवळ

  मुंबई 400 020

  संपर्काची माहिती:

  व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन.  मोबाईल

  91 88799 86893

  ई-मेल:

  fd@gpalmansion.com

  gm@gpalmansion.com

  दूरध्वनी क्रमांक: 022 22055001/02

  www.gpalmansion.com

  दर आहेत

  खूप वाजवी

  न्याहारी 30

  लंच प्लेट 75

  डिनर प्लेट 75

  800 खोल्या

  स्वयंपाकघर आणि जेवणाचे खूप प्रशस्त.

  कृपया व्यापकपणे सामायिक करा.  तुम्ही सगळे कसे आहात

  मुंबईत आप्त नातेवाईक असल्यास पी.एल.  ही माहिती प्रत्येकासह सामायिक करा.  * आम्ही रुग्णांना आणि नातेवाईकांना विनामूल्य टिफिन प्रदान करतो.  * क्षेत्र - दक्षिण मुंबई

  हॉस्पिटल्स: - जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जेजे, मुंबई सेंट्रल जवळ आणि व्हीटी ....

  संपर्काची माहिती: -

  आपण आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप देखील करू शकता

  * कल्पेश लोढा 9967236006 *

  * मनोज पटवारी 9820645070 *

  * अमृत जैन 9029373751 *

  कमीतकमी अशा लोकांसह पुढे जा जे अग्रेषित करुन इतरांना मदत करू शकतील.

  * आर.के.  घरगुती वैद्यकीय उपकरणे चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केली आहेत.

  * * व्हीलचेअर *

  * * सक्शन मशीन *

  * * वॉटरबेड *

  * * एअरबेड *

  * * केर कर *

  वापरण्यास विनामूल्य (परताव्यायोग्य ठेवीसह)

  संपर्क व्यक्ती: -

  * संजय शाह 9322516628 *

  * चिंतन पांड्या: - 7666311942 *

  * जोडा: -17-डी, निसारगा उपट.  आयडीबीआय बँक जवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67 67 *

  * साई वल्यात्री साक्षरता पॉलीक्लिनिक *

  "कंबर दरबार" शांतीलाल मोदी रोड, भुराभाई हॉल समोर, कांदिवली (प.), मुंबई.

  * टी: 02265811644 *

  * 0222865 9615 *

  * www.kambardarbar.org *

  * दिवसाची वेळ *

  1. * सामान्य ओपीडी * ₹ 1 / - केवळ औषधांसह

  दररोज सकाळी _11-30 आणि संध्याकाळी 4-30_

  २. * एक्स-रे * ₹ 100 / -

  दररोज _9 ते 5-00 वाजता_

  3. * ईसीजी * ₹ 70.00

  दररोज _ * * * 9.00 ते सकाळी 11.00 * _

  *.  * पॅथॉलॉजी * अत्यधिक अनुदानित दर.  केवळ सीबीसी ₹ 20 / -.

  दररोज _8.30 ते 12.00_

  *. * नेत्र तपासणी * २० / -

  दररोज _3.30.30_

  सकाळी _ सकाळी 9 वाजता: बुध, शुक्र, शनि ._

  मोतीबिंदू शस्त्रक्रिया: सर्वोत्कृष्ट भारतीय लेन्ससह विनामूल्य.

  लेझर (फाको) शस्त्रक्रिया:

  5,3०० / - यू.एस.  फोल्डेबल लेन्स आयात करीत आहे

  / 10,000 / - यूकेने फोल्डेबल herफेरिक लेन्स आयात केले.  (बाहेरील दर 40,000 / - आहे

  *. * स्त्रीरोगशास्त्र / आयव्हीएफ / हिस्टेरोस्कोपी *

  _ट्यू / थुर / शुक्र.  1 p.m.

  7. * त्वचेचे विभाजन.  * .00 20.00

  सोमवारी दुपारी ..pm० वाजता_

  8. * ऑर्थोपेडिक * 20.00

  मंगळ _3.30.30__

  9. * मधुमेह आणि कार्डिओ * .00 20.00

  बुधवारी दुपारी 8.30 वाजता_

  10. * मुलाचे विभाजन.  * .00 20.00

  शुक्रवारी _5.30 pm_

  11. कान / नाक / घसा * .00 20.00

  बुधवारी / शुक्र 4-30 संध्याकाळ_

  12. * दंत * नाममात्र शुल्क आरसी शुल्क: ₹ 750 / -.

  दररोज _9.00 ते दुपारी 1.00_दिली दुपारी ०.०० वाजता ते सायंकाळी 00.००_

  १.. * डायलिसिस * बीपीएल रूग्णांसाठी विनामूल्य

  दैनिक (फोन: 28067645)

  14. * ग्रीवाचा कर्करोग * (ग्रीवाचा कर्करोग) चाचणी मोफत

  15. * अँटी कॅन्सर इंजेक्शन * 14 ते 24 वर्षांच्या मुलींसाठी.

  16. * ज्येष्ठ नागरिकांसाठी वास्तविक सुनावणी *, प्रत्यक्ष खर्चाच्या 50%.  जन्मतःच पात्र मुलांसाठी विनामूल्य.

  १.. * उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात नोटबुक आणि इतर हार्डवेअर वस्तू.

  18. * * बी.बी.  एमबीबीएस  सी.ए.  सी.एस.  बी.पी.एच.आर.एम.  एम.सी.ए.  आणि एमबीए निवडले.  विद्यार्थ्यांसाठी पात्र उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती *.  * भेट *

  www.kambarda bar.org आणि सर्व आवश्यक तारणांसह फॉर्म सबमिट करा.

  कृपया p_zijn zasainani@rediffmail.com ईमेल वर संपर्क साधा

  * कोणत्याही शिफारसी आवश्यक नाहीत.  * कृपया शेअर करा.  ********** प्राप्त केल्यानुसार


*👉🏼 आपल्या ओळखीच्या ग्रुपमध्ये पाठवा कोणाला तरी फायदा होईल 🙏*

 *अलिबागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि येथील मंदिरांची निर्मिती*


 आजचे अलिबाग पुर्वी रामनाथ भागातच बहुतांशी सिमीत होते.खुद्द सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वास्तव्य रामनाथ येथील वाड्यात होते.ज्या अलिबाग शहराची आपण माहिती करून घेत आहोत तो भाग समुद्राने व्यापलेला होता.काही किनार्‍यावर मोकळी जागा होती तिथे नारळी पोफळीच्या विस्तृत बागा अली नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या मालकीच्या होत्या त्यांनी अलिबागच्या विस्तारासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यावरून अलिबाग हे नाव पडले अशी या नावामागची आख्यायिका सांगितली जाते.पुढे रामनाथहून अलिबागकडे केंद्र  सरकत गेले.खुद्द आंग्रे यांचा वाडा अलिबाग मध्ये आला.आंग्रेकालीन इमारतींची निर्मिती झाली.पेशवेकालीन कागदपत्रातून अलिबाग हा उल्लेख आढळून येतो.काही ठिकाणी श्रीबाग असेही क्वचितच नमूद केलेले आहे.

 या लेखात अलिबाग मधील मंदिरांचा अत्यंत थोडक्यात परिचय करून देत आहे.

    सर्वप्रथम गणेश मंदिरे पाहुया. अलिबागमधे गणेशाची  दोन मंदिरे आहेत. एक ब्राह्मण आळीत आहे.दुसरे कामत आळीत आहे. ब्राह्मण आळीतील मंदिर पुरातन आहे. कामत आळीतील मंदिर खाजगी आहे . या देवळात अतिशय सुंदर देखणी संगमरवरी गणेश मुर्ति आहे.तसेच रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनविलेले flouring आतिशय कलात्मक आहे.आता पाहुया अलिबागच्या  जोगळेकर नाक्यावरील शंकराचे मंदिर! हे सर्वात प्राचीन मंदिर आहे.(1721) परदेशी नावाच्या गृहस्थास दृष्टांत झाला आणि ही मुर्ती उंदेरी किल्ल्यातून आणून सध्याच्या मंदिरात तिची विधीवत स्थापना करण्यात आली.या मंदिरासमोर एक मोठी विहीर होती त्या विहीरीत अलिबागकरांच्या अनेक पिढ्यांनी पोहण्याचे धडे घेतले.ती विहीर बुजविण्यात आली आता तिथे छत्रपती शिवाजीमहाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविला असून तो अलिबागची शान आहे.तेथुन जवळच  सरखेल कान्होजी आंग्रे यांची आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या समाध्या आहेत. कान्होजीची समाधी उत्कृष्ट शिल्पकामाचा नमुना आहे.मराठ्यांची सागरी सत्ता प्रस्थापित करणा-या आंग्रे यांच्या समाधीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.अलिबागची आन मान शान म्हणजे हे पवित्र स्थान आहे.

    अलिबागचे बालाजी मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्राचा नमुनाच होय! याची रचना,बांधकाम हेमाडपंती असून मंदिरा बाहेरील आणि आतील  शिल्पकाम डोळ्यांचे पारणे फेडणे.या मंदिराची निर्मीती गोपाळशेठ दलाल यांनी केली. 

    अलिबागचे दुसरे शंकर मंदिर हे अत्यंत महत्वाचे असून ते आंग्रेवाड्याजवळच आहे.आंग्रेचे दिवाण सरदार बिवलकर यांनी ते बांधले त्यावरील कळस हा सोन्याचा आहे असे म्हणतात.तेथील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.एस टी बस स्थानकाजवळ हे मंदिर आहे.

    मोघे खाणावळी समोर विष्णुमंदिर व पोखरण लक्षवेधी आहे त्याची निर्मीती आंग्रेकालीन आहे.बालाजी नाक्यावरील श्री काळंबादेवी ही अलिबागची ग्रामदेवता असून नवरात्र उत्सवासाठी हे मंदिर भगिनिवर्गाचे श्रद्धास्थान  आहे.

      अलिबागचे मारूती मंदिर हे महत्वाचे आहे.या मंदिराच्या साक्षीने अनेक राजकीय  सामाजिक आणि सांस्कृतिक घटना घडल्या आहेत. अलिबागची हद्द येथपर्यंत होती तिथे स्मशानभूमी होती.येथून पुढे अलिबागचा समुद्र हटविण्यात आला.रेक्लेमेशनचा प्रयोग फार वर्षापूर्वीच झाला होता.या मंदिराची स्थापना सर्मथ रामदास यांच्या शिष्यानी केली अशी मान्यता आहे.येथे आसपास सतीच्या शिळाही सापडल्या आहेत व काही कोरलेली तुळशी वृंदावने आढळून आली आहेत: अशी अनेक इतरही मंदिर आहेत. ब्राह्मण आळीतील राम मंदिराचा समावेश करावा लागेल आता त्याचे नूतनीकरण झाले आहे.तसेच जोगळेकर नाक्याजवळ एक विठ्ठल मंदिर आहे तेही हेमाडपंथी पध्दतीचे आहे. बादजारपेठेतही एक राधाकृष्णाचे  मंदिर आहे एका छोटेखानी मंदिराचा उल्लेख करणे आवश्यक आहे.राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यालय मारुती नाक्यावर आहे त्याच्या मागच्या बाजुला एक घुमटी आहे त्यात देवतांच्या मुर्ति आहेत.त्यांना  सात आसरा(अप्सरा) म्हणतात.लहान मुलांना पूर्वी  देवी/ कांजण्या/गोवर/डांग्या खोकला असे जीवघेणे आजार होत असत तेव्हा या आसरांना नवस बोलला जाई .त्या काळातील आयाबायांची ती एक श्रध्दा होती. अलिबागच्या वास्तु आणि त्यांचे महत्व पुढील लेखात !

        डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन


*फेसबुक वरून साभार*

 भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून  येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.


भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात

अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे.  आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.


महाबळेश्वरला तर ५९२ मिमी पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. २४ तासांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरपाऊस होतो, त्या वेळेस आपल्याला धोरणात्मक बदल करावा लागपाऊसणार आहे, हे निश्चित.  एक काळ असा होता की, टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अतिशय यशस्वीरीत्या राबविली. त्याचे चांगले फायदेही महाराष्ट्राने अनुभवले. मात्र आता जागतिक वातावरण बदलाला सामोरे जाताना जिथे मोठय़ा प्रमाणावर पावसात वाढ झाली आहे, तिथे तरी वेगळी उपाययोजना करावी लागेल. तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा चालणार नाही.  त्यासाठी वेगळ्या उपाययोजनेसाठी आपण वेळीच प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दुराईस्वामी सांगतात.


काही ठिकाणी नद्यांचे पाट खुले ठेवायला हवे. जेजुरीला सर्व पाणी अडवत होतो. कऱ्हा नदीमध्ये ११८ टक्के पाणलोट क्षेत्रात कामे झाली. त्याचा परिणाम असा की,  त्यामुळे मोरगाव आदी क्षेत्रांत क्षारयुक्त पाण्यात वाढ झाली. याला रेसिडेन्स ऑफ टाइम असे म्हणतात. म्हणजेच आपण वापरलेले एक चमचा मीठ ते पुढची तब्बल १७६ वर्षे पाणलोट क्षेत्रात राहते. सगळेच पाणी अडवले तर त्यामुळे पलीकडे क्षारतेत वाढ होते. तापीमध्ये किंवा सांगलीसाताऱ्यात वाढलेली क्षारता हा त्याचाच परिणाम आहे. आता वाढलेल्या पावसामुळे आपल्याला परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जिथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे तिथे सुरुवातीचे पावसाचे पाणी आपण वाहून द्यायला हवे. खासकरून कोल्हापूरसारख्या परिसरात ऑगस्टनंतरचा आणि परतीचा असे दोन्ही पाऊस अनुभवता येतात. अशा ठिकाणी अखेरचा २० टक्के पाऊस कोल्हापूर बंधारा पद्धतीने अडवला जाऊ शकतो. त्याने क्षारता मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याची संधी या अधिकच्या पावसामुळे मिळणार आहे.


पुणे विद्यापीठातील विद्यार्थी डॉ. बाबाजी मस्कारे यांनी दरडी कोसळ्याची शक्यता असलेल्या पठारावरील प्रदेशांचा अभ्यास त्यांच्या पीएचडीच्या शोधप्रबंधामध्ये केला असून त्यात नकाशासह सारे काही उपलब्ध आहे. त्याचा वापर राज्य शासनास करता येऊ शकतो. रायरेश्वरचे पठार वगळता पाचगणी- महाबळेश्वर, ठोसेघर, कास आणि पाटण यांचा अभ्यास झाला पूर्णपणे करण्यात आला असून दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणेही शास्त्रीय अभ्यासाने शोधण्यात आली आहेत. कोकणामध्येही अशाचप्रकारचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.


बोर्गेवाडी हे पाटणच्या पठाराजवळचे गाव असून तिथे सातत्याने दरडी कोसळत होत्या. मात्र अशा प्रकारच्या शास्त्रीय अभ्यासानंतर तिथे शासनाने पुनर्वसन केले आहे. अशाच प्रकारे पुनर्वसन भिलारमध्येही पार पडले. त्यामुळे मनुष्य व वित्तहानी टाळता येते हे सिद्ध झाले आहे, असे सागून डॉ. दुराईस्वामी म्हणाले की, एक महत्त्वाचा बदल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये आणि धोरणनिर्णयामध्ये करावाच लागेल. आपण आजवर ब्रिटिशांची नियोजन पद्धती आदर्श मानली. त्यानुसार गेल्या ५०-१०० वर्षांतील घटनांचा, नोंदीचा अभ्यास करून त्यानुसार प्रकल्पांची बांधकामे केली जातात. यापुढे भविष्यात वातावरणबदलाची शास्त्रीय अभ्यासपूर्ण सर्वेक्षणे लक्षात घेऊन पुढच्या ५० वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या मॉडेल्सचा अभ्यास करत नियोजन करावे लागेल म्हणजे मग आपला द्रुतगती महामार्गच पाण्याखाली गेला अशा प्रसंगांना सामोरे तर जावे लागणार नाहीच, शिवाय मोठय़ा प्रमाणावर होणारी मनुष्य व वित्तहानीही टाळता येईल.

 [08/08, 10:51] Baby: *अन्नपूर्णा*

---------------- 


*माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान*. 

*एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात*. *भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच रहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका*. *त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात*. *मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.  मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवीप्रसन्न रहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो. अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रूसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्मयतो खाणे-पिणे करू नये. मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्मया प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत रहाते. स्वतःची अद्यात्मिक शक्तीही वाढते*....

💐💐💐💐💐💐💐💐

[08/08, 11:52] Baby: 🙏 *सर्व हिन्दू बांधवांना विनंती*🙏

    *दीप (दिवे धुण्याची)* अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे ...

    मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये ... 

     हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या  व्यापारात ज्यांचे आर्थिक  हितसंबध  गुंतले  आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे ...

     👍  या सणाला *घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.* दिवे आपल्या  जीवनातील *अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात,* त्यांच्याविषयी🙏 *कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण*🙏... 

     त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. *कोणताही धर्म  ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही,* उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात ... *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे*...

     वेळीच सावध व्हावे, *उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला  वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो,* सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी. ...

     तेव्हा *हिंदू बांधवांनी* ह्या सणाविषयी लोकांमध्ये *जागृती* करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती ...

 वातावरण बदलातील आव्हानातून सावरण्यासाठी

एकात्म भावनेने सर्वांचे योगदान मोलाचे

                        - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

                      राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 

           परभणी, दि. 7 :- वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हाने निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेने आपले योगदान दिल्याशिवाय पर्याय नसल्याच्या भावना  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू प्रकल्पराष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पकृषी अभियांत्रिकीफुड टेक्नॉलॉजीमुलींचे वसतिगृहग्रंथालय आदी विभागाची पाहणी करुन प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयलविद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवणजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळेजिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,  महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.

            आव्हाने किती जरी आले तरी नव्या पिढीपर्यंत नवनिर्मितीचे संकल्प पोहोचले पाहिजेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्या पाहिजेत. देशाच्या विकासात त्यांचा अधिकाधिक सहभाग घेवून विकास प्रक्रियेला चालना देणेत्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही खरी विद्यापीठाची जबाबदारी आहे. भारतात पूर्वीपासून उत्तम शेतीमध्यम व्यापार व नौकरीला कनिष्ठ दर्जा दिलेला आहे. भविष्यात कृषी क्षेत्रात व शेतीपूरक कृषी व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी दडल्या असून स्वावलंबनाच्यादृष्टीने कृषी व कृषी पुरक विषयावर दिले जाणारे शिक्षण अधिक मोलाचे आहे. ही जबाबदारी कृषी विद्यापीठाने व या क्षेत्रात अध्यापन करणाऱ्या गुरुजनांनी लक्षात घेवून स्वत:ला सिध्द करण्याचे भावनिक आवाहन ही राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

            कृषी क्षेत्रासंदर्भात अनेक ठिकाणी अनेक संशोधन चालू असल्याचे दिसून येते. हे संशोधन शेतकऱ्यांच्या जीवनमानाला उंचावणारे असल्याने ते जितक्या लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचेल तितक्या लवकर त्यांची उपयोगिता सिध्द होईल. संशोधनाला मर्यादीत स्वरुपात न ठेवता त्याला अधिक व्यापकता देण्यासाठी विद्यापीठाने पुढे आले पाहिजे. माहितीचे आदान प्रदानातून  शिक्षणाला व्यापकता येते. आपापल्या क्षेत्रात जागतिक पातळीवर जिथे कोठे  संशोधन सुरु असेल त्या-त्या ठिकाणाशी समन्वय साधून वैश्विक ज्ञानाची द्वारे समृध्द केली पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाकडून व्यक्त केली.

            आपण भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे विद्यापीठ आता विद्यार्थ्यांतील ताऱ्यांना घडविण्यासमवेतच चंद्राप्रमाणेही प्रकाशमान करेलअशी भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त करुन विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल कोश्यारी यांची विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी

            महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या दौऱ्यात विविध प्रकल्पांना भेटी देवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींनीशी संवाद साधला. तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस व सरस्वती पुजनानंतर त्यांनी बांबु संशोधन प्रकल्पास भेट दिली. याचबरोबर राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पकृषी अभियांत्रिकीफुड टेक्नॉलॉजीग्रंथालयमुलींचे वसतिगृह यांची पाहणी करुन कुलगुरुंना आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी वसंतराव नाईक उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 मिठीला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देणार

                           -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

          मुंबईदि. 7- गाळ काढणेतरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून 'मिठीला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. 

          मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन श्री ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

          एमएमआरडीए आणि मरीन डेब्रिज पार्टनरशिप यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आज हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात नदीतील तरंगता कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाईल. याद्वारे नदीमार्गातून समुद्रात जाणारा प्लास्टिक आणि इतर तरंगता कचरा कमी केला जाणार आहे.

          मागील काही वर्षात मिठी नदीला नाल्याचे स्वरूप आले आणि पावसाळ्यात नागरी वस्तीला धोका निर्माण झाला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मिठी नदीची स्वच्छता हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहेतथापि आता त्यावर भागणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी नाल्याचे स्वरूप आलेल्या मिठीला पुन्हा नदीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे, असे श्री ठाकरे म्हाणाले.

           नदीतील गाळ काढणेतरंगता कचरा वेगळा करणे आणि आजूबाजूच्या परिसरातून येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांवर काम करणे आवश्यक आहे. किनाऱ्यावरील नागरिकांची काळजी घेऊन हे काम करावे लागणार असल्याने थोडा वेळ लागला तरीही मिठी कायमस्वरूपी स्वच्छ व्हावी यासाठी नागरिकांचे सहकार्यही महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मिठीला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्यापासून सुरूवात करून शासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांना सहकार्य करावेअसे आवाहन श्री ठाकरे यांनी केले.

          वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभर समस्या निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसून येत असून हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आपल्या वसुंधरेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.  

          महापौर श्रीमती पेडणेकर यांनीदरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्यात येत असून महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक बाबी करीत राहीलअशी ग्वाही दिली. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एमएमआरडीए आपल्यामार्फत सर्व ते प्रयत्न करील, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले. यावेळी मिठी नदीच्या स्वच्छता प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

00000

 

 ऑलिंपिक कांस्यपदकविजेत्या बजरंग पूनिया याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

बजरंग पुनियाने पदकतालिकेत भारताचा आणि देशात कुस्तीचा सन्मान वाढवला

 

          मुंबई दि 7"टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनीगटात फ्रीस्टाइल कुस्तीचे कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंग पूनिया याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .

                    दुखापतीमुळे उपांत्यफेरी  जिंकू न शकलेल्या बजरंगने कांस्य पदकासाठीचा सामना

8-0 असा निर्विवाद जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. बजरंगने जिंकलेलं कांस्यपदक भारताला पदकतालिकेत आणि कुस्तीला देशात वरच्या स्थानावर घेऊन जाईलअसा विश्वास वाटतो. बजरंग पूनियात्याचे प्रशिक्षकमार्गदर्शकसपोर्टटीम व चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

 


Featured post

Lakshvedhi