ऑलिंपिक कांस्यपदकविजेत्या बजरंग पूनिया याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
बजरंग पुनियाने पदकतालिकेत भारताचा आणि देशात कुस्तीचा सन्मान वाढवला
मुंबई दि : 7"टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनीगटात फ्रीस्टाइल कुस्तीचे कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंग पूनिया याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .
दुखापतीमुळे उपांत्यफेरी जिंकू न शकलेल्या बजरंगने कांस्य पदकासाठीचा सामना
8-0 असा निर्विवाद जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. बजरंगने जिंकलेलं कांस्यपदक भारताला पदकतालिकेत आणि कुस्तीला देशात वरच्या स्थानावर घेऊन जाईल, असा विश्वास वाटतो. बजरंग पूनिया, त्याचे प्रशिक्षक, मार्गदर्शक, सपोर्टटीम व चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
No comments:
Post a Comment