Wednesday, 4 November 2026

उमेद अभियानाचा ग्राहकांच्या नजरेसमोर 'ताजा दिवाळी फराळ' बनवण्याचा अभिनव उपक्रम;

  

उमेद अभियानाचा ग्राहकांच्या नजरेसमोर

'ताजा दिवाळी फराळ' बनवण्याचा अभिनव उपक्रम;

  • फराळ महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

 

            मुंबई,दि. ३ :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद अभियान) द्वारे आयोजित विशेष 'दिवाळी फराळ महोत्सवाचा  शुभारंभ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीधर डुबे-पाटील यांच्या हस्ते नवी मुंबई येथे झाला.

 

            यावेळी अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती  होती. या सोहळ्यास अभियानाचे उपसंचालक  बाळासाहेब टट्टू, श्वेता पालवे,  संदीप जठार तसेच तंत्र अधिकारी तथा अवर सचिव शरद गीते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

ग्राहकांच्या प्रत्यक्ष नजरेसमोर ताजा फराळ!

            स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा फराळ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाने यावर्षी 'ग्राहकांच्या समोर प्रत्यक्ष दिवाळी फराळ तयार करण्याची' अभिनव संकल्पना राबवली आहे. यामुळे फराळाची स्वच्छता, दर्जा आणि ताजेपणाबाबत ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शेतकऱ्यांच्या थेट मालाचा वापर

            या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फराळ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासोबतच ग्राहकांनाही शुद्ध आणि कसदार पदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.

 

स्वाद अस्सल परंपरेचा!

            या महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेली ताजी शेव, खुसखुशीत अनारसे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या, चविष्ट चिवड्यांचे प्रकार तसेच अस्सल देशी तुपात तयार केलेले बेसन व रव्याचे लाडू यांसारखे पदार्थ उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi