Friday, 13 November 2026

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज

 आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

विदर्भात दुग्धव्यवसायाच्या विकासाला मोठी संधी असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात दुग्धव्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू असून एक हजार कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. कोल्हापूरच्या तुलनेत संपूर्ण विदर्भातील दूध उत्पादन वाढविण्याची गरज असून दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि पशुसंवर्धन हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत ठरू शकतात, असे नमूद केले. शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक उपचार व तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध होईल. दिवंगत दत्ता मेघे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असून, रामटेकमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न मेघे कुटुंबियांनी  पूर्णत्वास नेल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi