Thursday, 12 November 2026

जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

 जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

            संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पाणी आरक्षणाबाबत शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची तपासणी करावी. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध आणि न्याय्य वितरण होईल, यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नद्यांचे खोलीकरण, तलावांमधील गाळ काढणे, नाले खोलीकरण, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ‘व्हीबी-जीरामजी’ योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी. दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विजेचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने वीजपुरवठा सुरळीत करावा. संभाव्य पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलसंधारण आणि वीजपुरवठा या सर्व बाबींचे वेळेत नियोजन करून प्रशासनाने आगामी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi